१८ सप्टेंबरला झळकणार ‘लस्ट स्टोरीज ३’
‘लस्ट स्टोरीज 3’ या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरची सुरुवात अदिति राव हैदरीच्या आवाजातील एका संवादाने होत आणि यानंतर राधिका आपटे, कोंकणा सेन शर्मा, राधिका मदान, सना थम्पी या अभिनेत्री दिसून येतात. तर या सीरिजमध्ये विजय शर्मा, अली फजल, सिद्धार्थ, अभिषेक बॅनर्जी आणि गुरफतेह पीरजादा देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
नेटफ्लिक्सच्या या प्रसिद्ध एंथोलॉजी फ्रेंचाइजीचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यात विक्रमादित्य मोटवानी, किरण राव, शकुन बत्रा आणि विशाल भारद्वाज यासारख्या दिग्दर्शकांकडून साकारण्यात आलेल्या कहाण्या पाहता येणार आहेत. मागील दोन एंथोलॉजीप्रमाणे यंदाही ‘लस्ट स्टोरीज 3’मध्ये प्रेम, नातेसंबंध आणि इच्छांच्या चार कहाण्या पाहता येणार आहेत. लस्ट स्टोरीज 3 ही सीरिज 18 सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. प्रत्येक दिग्दर्शकाने स्वत:च्या वाट्याला आलेली कहाणी प्रभावीपणे मांडल्याचे ट्रेलर पाहून जाणवते. या सीरिजचा स्वत:चा असा वेगळा एक चाहतावर्ग असल्याने तो याच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत आहे.