For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आज दिसणार चंद्रग्रहण

06:17 AM Mar 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
आज दिसणार चंद्रग्रहण
Advertisement

भारतातून संध्याकाळी 6:26 ते 6:46 पर्यंत दिसणार : खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चालू वर्षातील पहिले चंद्रग्रहण मंगळवार, 3 मार्च रोजी होत आहे. हे आंशिक चंद्रग्रहण असून ते सिंह राशीत आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात होईल. हे चंद्रग्रहण भारतातही दिसणार असल्याने देशात सुतक काळ वैध असेल. चंद्रग्रहण दुपारी 3:20 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6:46 वाजता संपेल. याचा सुतक काळ सकाळी 6:20 वाजता सुरू होईल. भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये हे चंद्रग्रहण दिसेल. वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण भारत, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेत दिसेल. तसेच उत्तर आणि दक्षिण अमेरिका आणि प्रशांत महासागर भागातील खगोलप्रेमी हे पाहू शकतील.

Advertisement

सूतक काळ चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. या आधारे, 3 मार्च रोजी सकाळी 6:20 वाजता सुतक काळ प्रभावी होईल आणि ग्रहणाने संपेल. शास्त्रांमध्ये सुतक काळाचे विशेष महत्त्व असल्याचे वर्णन केले आहे. या काळात शुभ आणि मंगलदायी कामे केली जात नाहीत. 3 मार्च रोजी भारतात चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 6:26 च्या सुमारास असणार आहे. त्यामुळे चंद्रोदय होताच भारताच्या विविध भागात चंद्रग्रहण दिसण्याची शक्यता आहे. त्यानंतर, चंद्रग्रहण संध्याकाळी 6:46 पर्यंत दिसणार आहे. हे चंद्रग्रहण भारतातील दिल्ली-एनसीआर, कोलकाता, चेन्नई, मुंबई, हैदराबाद, बेंगळूर, अहमदाबाद, पटना, भुवनेश्वर, गुवाहाटी, इम्फाळ, शिलाँग, कोहिमा आणि इटानगर अशा बहुतांश शहरांमधून पाहता येणार आहे.

पूर्ण चंद्रग्रहणादरम्यान संपूर्ण चंद्र पृथ्वीच्या सावलीत जातो. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत असताना पूर्ण चंद्रग्रहण होते. सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी असते. या काळात, संपूर्ण चंद्र पृथ्वीच्या खोल सावलीत (अंब्रा) जात असल्यामुळे विविध कलाविष्कार अनुभवता येतात.

Advertisement
Tags :

.