For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुजरातविरुद्ध आज लखनौ विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी सज्ज

06:00 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुजरातविरुद्ध आज लखनौ विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी सज्ज
Advertisement

वृत्तसंस्था /लखनौ

Advertisement

इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज रविवारी गुजरात टायटन्सचा सामना करताना लखनौ सुपर जायंट्स विजयाची हॅट्ट्रिक करू पाहेल आणि त्यादृष्टीने त्यांचा नवीन वेगवान गोलंदाज मयंक यादववर भर राहील. यादवने आयपीएलमध्ये आपला वेग आणि नियंत्रणासह सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लागोपाठच्या सामन्यांत त्याने सामनावीर पुरस्कार जिंकले आहेत. पंजाब किंग्ज व रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविऊद्ध केलेल्या नेत्रदीपक कामगिरीमुळे यादवला भारतीय संघात लगेच स्थान मिळावे की नाही याविषयी चर्चा सुरू झाली आहे. पण भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी यादवला सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. फलंदाजीच्या आघाडीवर ‘एलएसजी’कडे क्विंटन डी कॉक आणि के. एल. राहुल अशी भक्कम सलामीची जोडी आहे. डी कॉक उत्कृष्ट फॉर्ममध्ये असला, तरी राहुलला मात्र चांगल्या सुऊवातीचा फायदा घेता आलेला नाही.

शेवटच्या षटकांमध्ये निकोलस पूरन हा एलएसजीचा धडाकेबाज फलंदाज राहिलेला आहे. तसेच कृणाल पंड्या देखील मागील सामन्यात उपयुक्त ठरला. पण लखनौ संघासाठी देवदत्त पडिक्कल आणि ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसचा फॉर्म हा मुख्य चिंतेचा विषय राहिला आहे. गोलंदाजीत यादवला नवीन-उल-हक, यश ठाकूर, मोहसीन खान, स्टॉइनिस आणि लेगस्पिनर रवी बिश्नोई यांच्याकडून अधिक पाठबळाची गरज आहे. लखनौ तीन सामन्यांतून दोन विजयांसह चौथ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, नवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत गुजरातची मोहीम संमिश्र राहिली आहे. दोन सामने ज्ंिांकून व दोन गमावून ते सातव्या स्थानावर आहेत. मागील सामन्यात सूर गवसलेला गिल त्याच आक्रमक पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. बी. साई सुदर्शनही चांगल्या फॉर्ममध्ये असून तो मोठ्या डावाच्या शोधात आहे. तथापि, वृद्धिमान साहा, विजय शंकर यांनी अधिक चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. गुजरातच्या गोलंदाजीत मोहित शर्माची कामगिरी उठून दिसली आहे. परंतु त्याला अजमतुल्ला उमरझाई, उमेश यादव, रशिद खान आणि नूर अहमद यांच्याकडून अधिक चांगली साथ मिळायला हवी.

Advertisement

संघ : गुजरात टायटन्स-शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, रॉबिन मिन्झ, केन विल्यमसन, अभिनव मंधार, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहऊख खान, जयंत यादव, राहुल तेवतिया, कार्तिक त्यागी, सुशांत मिश्रा, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, साई किशोर, उमेश यादव, रशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा व मानव सुतार.

लखनौ सुपर जायंट्स : के. एल. राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, कृणाल पंड्या, युद्धवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, शामर जोसेफ, मयंक यादव, मोहसीन खान, के. गौतम, अर्शिन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, अॅश्टन टर्नर, मॅट हेन्री, मोहम्मद अर्शद खान.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.