For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एलटीटीएसची उलाढाल लवकरच 3 अब्ज डॉलर्सवर

07:00 AM Feb 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
एलटीटीएसची उलाढाल लवकरच 3 अब्ज डॉलर्सवर
Advertisement

मुख्य कार्यकारी अधिकारी चढ्ढा यांचा दावा

Advertisement

नवी दिल्ली : लार्सन अँड टुब्रो ग्रुपची अभियांत्रिकी, संशोधन आणि विकास कंपनी लार्सन अॅण्ड टुब्रो टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस (एलटीटीएस) ने भविष्यात तीन अब्ज डॉलर्सचे उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक अमित चढ्ढा यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की या अंतर्गत कंपनीचे लक्ष्य गतिशीलता, शाश्वतता आणि तंत्रज्ञान यासारख्या तीन प्रमुख श्रेणींमार्फत उत्पन्न एक अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे आहे.

एका विशेष संभाषणात चढ्ढा म्हणाले की, दीर्घकालीन, एलटीटीएसचे एकूण लक्ष्य 5 अब्ज डॉलर्सची कंपनी बनण्याचे आहे, ज्यामुळे ती सध्याच्या जागतिक स्तरावर तिसऱ्या स्थानावरून इआर अॅण्ड डी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी बनेल. गेल्या तिमाहीत आम्ही 50 दशलक्ष डॉलर्सची डील केली आहेत. गेल्या तिमाहीत आमच्याकडे सर्वात मोठे संभाव्य व्यवहार होते.

Advertisement

कंपनीचे उत्पन्न 2024 च्या आर्थिक वर्षात 1.2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. चढ्ढा म्हणाले की, गेल्या नऊ महिन्यांत एलटीटीएसने कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये, एलटीटीएसने इंटेलिस्विफ्ट सॉफ्टवेअरचे अधिग्रहण पूर्ण केले. या अधिग्रहणामुळे 25 हजार संख्येच्या कर्मचाऱ्यांच्या कंपनीत आणखी 1500 कर्मचाऱ्यांची भर पडली. एलटीटीएसला आर्थिक वर्ष 2025 मध्ये स्थिर चलनात 10 टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये इंटेलिस्विफ्टचे योगदान देखील समाविष्ट आहे.

Advertisement
Tags :

.