कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जीएएएसआयसोबत एलअँडटीची भागीदारी

06:49 AM Nov 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतात तयार होणार अत्याधुनिक मानवरहित विमानप्रणाली

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

देशातील दिग्गज कंपनी लार्सन अँड टुब्रोने (एलअँडटी) शुक्रवारी अमेरिकन कंपनी जनरल एटॉमिक्स एरोनॉटिकल सिस्टीम्स इंक (जीएएएसआय) एक रणनीतिक करार केला आहे. या भागीदारीच्या अंतर्गत भारतीय सैन्यासाठी दोन्ही कंपन्या मीडियम अल्टीट्यूड लॉन्ग एंड्यूरेन्स (एमएलई) रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट सिस्टीम (आरपीएएस)ची निर्मिती भारतात करणार आहेत.

या भागीदारीच्या अंतर्गत एलअँडटीची इंजिनियरिंग, अचूक उत्पादन आणि डिफेन्स-एअरोस्पेस क्षेत्रात सिस्टीम इंटीग्रेशनचे प्रावीण्य आणि जीएएएसआयच्या संचालन क्षमतेचा वापर केला जाणार आहे. या भागीदारीच्या अंतर्गत एलअँडटी संरक्षण मंत्रालयाच्या आगामी एमएएलई आरपीएएस कार्यक्रमात भाग घेणार आहे. यात एलअँडटी प्रमुख सहभागी कंपनी असेल आणि जीएएएसआय भागीदार असणार आहे.

एमक्यू-साखळी आरपीएएसचे उत्पादन शक्य

या सहकार्यातून जीए-एएसआयच्या एमक्यू-साखळी आरपीएएसचे उत्पादन  शक्य होऊ शकणार आहे. हे मानवरहित विमान जगभरात व्यापक स्वरुपात कार्यरत असून टेहळणी आणि हल्ल्याच्या मोहिमांमध्ये लाखो तासांचे उ•ाण केले आहे.

एअरोस्पेस तंत्रज्ञानात वाढती आत्मनिर्भरता

ही भागीदारी भारताला स्वदेशी स्वरुपात अत्याधुनिक मानवरहित प्लॅटफॉर्म्सच्या निर्मितीची एक अनोखी संधी प्रदान करते. ही भागीदारी भारताच्या संरक्षण क्षमतांना महत्त्वपूर्ण स्वरुपात वाढविणार आहे आणि एअरोस्पेस तंत्रज्ञानात आत्मनिर्भरतेला पुढे नेणार असल्याचे उद्गार एलअँडटीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस.एन. सुब्रह्यमण्यन यांनी काढले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article