For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एल अॅण्ड टी फायनान्सच्या समभागाचा विक्रम

07:00 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
एल अॅण्ड टी फायनान्सच्या समभागाचा विक्रम
Advertisement

वर्षाचा विक्रम मोडत नोंदवली 5 टक्क्यांची वाढ : वित्त क्षेत्रातील संस्था

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

एल अॅण्ड टी फायनान्सच्या समभागात गुरुवारी मोठी उसळी दिसून आली. इंट्राडे दरम्यान, एनबीएफसी कंपनीच्या समभागांनी 1 वर्षाचा (52 आठवडे) विक्रम मोडला आणि 5 टक्के वाढ नोंदवत समभाग 179रुपयांवर पोहचला आहे. एल अॅण्ड टी फायनान्सच्या समभागांमध्ये ही उडी 8.82 कोटी समभाग विकल्यानंतर दिसून आली. ब्लॉक डीलद्वारे कंपनीचे 4.04 टक्के समभाग विक्री करण्यात आल्याचे समजते. यापूर्वी देखील मीडिया रिपोर्ट्सने उघड केले होते की गुंतवणूक कंपन्या बेन कॅपिटल आणि बीएनपी पारिबास गुरुवारी ब्लॉक डीलद्वारे एल अॅण्ड टी फायनान्सचे 180 दशलक्ष अब्ज (1,500 कोटी रुपये) किमतीचे शेअर्स विकतील. त्याप्रमाणे गुरुवारी सदरची समभागांची विक्री झाली आहे. बेन कॅपिटलच्या दोन संस्था-बीसी एशिया ग्रोथ इन्व्हेस्टमेंट्स आणि बीसी इन्व्हेस्टमेंट्स व्हीआय-आणि बीएनपी पारिबास फायनॅन्शियल मार्केट्स यांनी एकूण 3.54 टक्के भागभांडवल (88.2 दशलक्ष शेअर्स) रुपये 169.17 प्रति शेअर या दराने विकले असल्याची नोंद आहे. मात्र, या ब्लॉक डीलमध्ये खरेदीदार कोण आणि विक्रेता कोण होता हे अद्याप अधिकृतपणे कळू शकलेले नाही.

Advertisement

समभागाचा उत्तम परतावा

दुपारी 12:50 वाजता, एल अॅण्ड टी फायनान्सचे समभाग 3.46 टक्केच्या उसळीसह 176.50 रुपयांवर व्यवहार करत होते. तर, कंपनीच्या समभागाची सुरुवातीची किंमत 170.60 रुपये नोंदवली गेली. सात सत्रात हा समभाग 19 टक्के इतका वाढला आहे. तर कंपनीच्या समभागाने वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना 61 टक्के इतका परतावा दिला आहे. सध्या एल अॅण्ड टी फायनान्सचे बाजारमूल्य 43,945.66 कोटी रुपये आहे.

Advertisement
Tags :

.