पर्शियन उपसागरातून एलपीजी टँकर दाखल
विशाखापट्टणमच्या दिशेने वळला : दोन वेळा बदलावा लागला मार्ग
संयुक्त अरब अमिरातमधून (युएई) 47,000 टन एलपीजीसह भारतात पोहोचलेले जहाज पाइन गॅस अखेर आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणमच्या दिशेने वळवावे लागले आहे. 227 मीटर लांब जहाज पर्शियन उपसागरातून बाहेर पडत होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे भारतीय सागरी क्षेत्रात दाखल झाले तेव्हा त्याचे मूळ अंतिम ठिकाण न्यू मंगळूर बंदर होते. भारतीय नौदलाच्या युद्धनौकांना पाइन गॅसला सुरक्षा पुरवत भारतीय सागरी क्षेत्रात सोडल्यावर त्याचे अंतिम ठिकाण बदलून ओडिशाचे धामरा बंदर करण्यात आले. परंतु अखेर हे जहाज विशाखापट्टणम येथे डॉक करण्याचा निर्णय झाला. यामागे कारण देशात एलपीजीची टंचाई आणि याची लवकरात लवकर डिलिव्हरी आहे.
एलपीजी हँडलिंगची सुविधा
विशाखापट्टणम बंदराची डीप वॉटर फॅसिलिटी एलपीजी हँडलिंगसाठी पूर्णपणे उपयुक्त आहे आणि पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायजेशनच्या मापदंडांचे पूर्णपणे पालन करणारे आहे.
एलपीजी, नॅचरल गॅस टँकर्सना प्राथमिकता
-केंद्र सरकारने देशातील सर्व बंदरांना एलपीजी आणि नैसर्गिक गॅस घेऊन येणाऱ्या टँकर्सना अन्य जहाजांच्या तुलनेत प्राथमिकता देण्याचे निर्देश दिले आहेत.
-इराण युद्धामळे देशाच्या अनेक हिस्स्यांमध्ये एलपीजी पुरवठासाखळीत अडथळे निर्माण झाले असून सरकार ही समस्या दूर करण्यासाठी अत्याधिक सक्रीय आहे.
-एलपीजी टँकर पाइन गॅस युएईमध्ये गनतून येथून 47 हजार कार्गो घेऊन भारताच्या दिशेने रवाना झाले होते. हा भाग दुबई आणि अबुधाबीदरम्यान आहे.
-28 फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ला केल्यामुळे हे जहाज सुमारे महिन्याभरापर्यंत पर्शियन उपसागरात नांगर टाकून उभे राहिले होते.
-इराणने भारताच्या काही जहाजांना एक-एक करत होर्मुझ सामुद्रधुनीमधून जाण्याची अनुमती दिल्यावर जग वंसतसोबत पाइन गॅसचाही क्रमांक आला.
धामरा बंदरात नेणे नव्हते सुविधाजनक
-पाइन गॅस जहाज प्रथम कर्नाटकच्या न्यू मंगळूर बंदरावर एलपीजी अनलोड करणार होते.
-तेथे काही ऑपरेशनल अडचणींमुळे जहाजाला पूर्व किनाऱ्यावर ओडिशाच्या धामरा बेटाच्या दिशेने रवाना करण्यात आले.
-पश्चिम किनाऱ्यापासून अधिक अंतरामुळे जग वसंतच्या तुलनेत याला डॉक होण्यास अधिक वेळ लागला.
-जग वंसत हे जहाज 28 मार्च रोजी गुजरातच्या वाडिनार बंदरावर पोहोचून अनलोड करण्यात आले होते.
-संचालनात्मक कारणांमुळे असे बदल होत राहतात. ऑपरेटर आणि सरकार सातत्याने समन्वय करत आहेत.
-नेव्हिगेशनमध्ये समुद्राची स्थितीही देखील अशाप्रकारच्या निर्णयांमध्ये एक महत्त्वाचा घटक असतो.
बंदर प्राधिकरण तयार
पश्चिम आशिया संकटामुळे जगभरातील शिपिंग उद्योगक्षेत्रात एकप्रकारच्या अस्थिरतेची स्थिती निर्माण झाली आहे. हे पाहता भारताच्या काही बंदरांवर ट्रॅफिग हँडल करण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. देशात सध्या जी बंदरे आखाताकडून येणाऱ्या ट्रॅफिकसाठी पूर्णपणे तयार आहेत, त्यात आंध्रप्रदेशचे विशाखापट्टणम, गुजरातचे मुंद्रा, कर्नाटकातील न्यू मंगळूर, केरळचे कोची, नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर आणि चेन्नई बंदर सामील आहे.