Kolhapur Crime News | प्रेमाचे जाळे, अश्लील व्हिडीओ आणि अत्याचार; शिरोली पुलाची प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विशेष पथक तैनात
कोल्हापुरात तरुणींना ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
कोल्हापूर - तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार करुन व्हिडीओ तयार केल्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. आरोपी दोन असून गुन्हे आणि घटनास्थळे वेगवेगळी असल्यामुळे या प्रकरणाचा तपास गतीमान होण्यासाठी या विशेष तपास पथकाची नियुक्ती केली असून, अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू, उपअधीक्षक अमोल ठाकूर, शहर उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या नेतृत्वाखाली या तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत जवळीक साधून तरुणींचे अश्लील व्हिडीओ केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. या प्रकरणी हातकणंगले पोलिसांनी शाहीद समीर सनदे (वय २२ रा. शिरोली पुलाची ता. हातकणंले) याला रविवारी अटक केली. यानंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले. शाहीदचा साथीदार शाहरुख हुसेन देसाई (वय ३० रा. शिरोली पुलाची) यालाही पोलिसांनी कराड येथून अटक केली. शाहीद आणि शाहरुख या दोघांनी महाविद्यालयीन तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ तयार केले.
यानंतर हे फोटो आणी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून दोन तरुणींवर वारंवार अत्याचार केल्याचे निष्पण्ण झाले. या प्रकरणी पीडीत तरुणीने हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याच पाठोपाठ आणखी एका तरुणीने शाहीद विरोधात शाहूपुरी पोलीसठाण्यात दिली.
गुन्ह्याची संख्या वाढण्याची शक्यता
शाहीद आणि शाहरुख यांच्या विरोधात दाखल होणाऱ्या गुन्ह्याची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या दोघांचे मोबाईलशाहीद आणि शाहरुख यांचे मोबाईल फॉरेन्सिक विभागाकडे दिले आहेत. फॉरेन्सिक विभागाच्या अहवालानंतर यामध्ये आणखी खुलासे होणार आहेत. तसेच पिडीत मुलींच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता आहे.
असे आहे विशेष तपास पथक
अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार, जयसिंगपूर पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक संतोष डोके, शरद मेमाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव, पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव, ६ पोलीस अंमलदार यामध्ये २ महिला, ४ पुरुष अंमलदारांचा समावेश आहे.
तीन महिला अधिकारी
विशेष तपास पथकात तीन महिला अधिकारी आणि २ महिला पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. पीडीत तरुणींचे जबाब घेणे, इतर महिला साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यासाठी पथकामध्ये महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेशकेला आहे.
संशयितांच्या घराची होणार झडती
हातकणंगले पोलिसांनी अटक केलेल्या शाहीद आणी शाहरुख या दोघांच्या घराची झडती घेण्यात येणार आहे. लवकरच एसआयटीचे पथक या दोघांच्या घराची झडती घेवून त्यांचा लॅपटॉप, मोटार, दुचाकी जप्त करणार आहेत. याचसोबत या दोघांच्या बँक खात्यांचीही पडताळणी करण्यात येणार आहे.
आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी
प्रेम प्रकरणाचा गैरफायदा घेत तरुणी आणिमहिलांचे अश्लील व्हिडिओ तयार करून त्याद्वारे ब्लॅकमेल आणि शोषण केल्याच्या धक्कादायक प्रकरणामुळे पुलाची शिरोली परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर प्रकरणातील अटक आरोपींना पेठवडगाव न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. तपासादरम्यान आरोपींचे मोबाईल, इलेक्ट्रॉनिक पुरावे, सोशल मीडियावरील व्यवहार यांची सखोल चौकशी केली जाणार असून आणखी काही पीडित तरुणी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, भारतीय जनता पक्ष, काँग्रेससह विविध संघटना, व्यापारी वर्ग, डॉक्टर असोसिएशन, ग्रामस्थ आणि महिला वर्गातून संतापाची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे पालकवर्गातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून तरुणींच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. सहा दिवसांच्या पोलीस कोठडीतून या प्रकरणातील आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता असल्याने संपूर्ण परिसराचे लक्ष या तपासाकडे लागले आहे.