For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रेम खरंच आंधळ असतं!

06:02 AM Mar 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
प्रेम खरंच आंधळ असतं
Advertisement

प्रेयसीसाठी सहन केल्या प्रसुतीसारख्या वेदना

Advertisement

प्रेमात लोक काहीही करण्यास तयार होत असतात. अनेकदा त्यांच्या कहाण्या इतरांसाठी उदाहरण ठरतात. तर कधीकधी हा मूर्खपणा ठरतो. असेच एक प्रकरण समोर आले असून यात एका युवकाला स्वत:च्या प्रेयसीसमोर प्रेम सिद्ध करणे चांगलेच महागात पडले आहे.

प्रेयसीचा हट्ट, प्रियकराची कसोटी

Advertisement

ही घटना चीनच्या हेनान प्रांतात घडली आहे. पुरुष कधीच महिलांप्रमाणे प्रसुतीवेदना (लेबर पेन) सहन करू शकत नाही असे या प्रेयसीचे मानणे होते. तिने स्वत:च्या प्रियकराला खरोखरच प्रेम करत असशील तर या वेदना सहन करून दाखव असे आव्हान दिले. ही युवती स्वत:ची आई अन् बहिणीसोबत युवकाला घेत लेबर पेन सिम्युलेशन सेंटरमध्ये पोहोचली. तेथे आर्टिफिशियल पद्धतीने प्रसुतीवेदनांचा अनुभव करून दिला जातो. या अनुभवानंतर माझा प्रियकर महिलांच्या समस्या चांगल्याप्रकारे समजू शकेल आणि भविष्यात माझ्यासोबत चांगले वागेल असे या युवतीचे म्हणणे होते.

तीन तासांपर्यंत सहन केला असह्या त्रास

प्रारंभी युवकाने हा प्रकार शुल्लक समजला, परंतु जसजसा त्रास वाढत गेला तसतशी त्याची प्रकृती बिघडू लागली. पहिल्या 90 मिनिटांपर्यंत वेदना सहन करण्याजोग्या होत्या, परंतु ही पातळी 8 वर पोहोचताच युवक तडफडू लागला. पातळी 10 येताच तो ओरडू लागला, शिव्या देखील देऊ लागला, तर त्याची प्रेयसी आणि बहिण सातत्याने त्याचा घाम फुसत होते, तर दुसरीकडे युवकाची प्रकृती बिघडली.

डॉक्टरांना करावी लागली शस्त्रक्रिया

या टॉर्चरच्या काही तासांनी युवकाला पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या आणि तो उलटी करू लागला. एका आठवड्यानंतरही त्याची प्रकृती न सुधारल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता छोट्या आतड्याच्या एका हिस्स्याला नुकसान पोहोचल्याचे दिसून आले, यामुळे तो हिस्सा काढून टाकावा लागला.

ब्रेकअप अन् कायदेशीर कारवाईची तयारी

या घटनेनंतर युवकाच्या परिवाराने प्रेयसीला रुग्णालयात त्याला भेटू देखील दिले नाही. तसेच विवाहास नकार देण्यात आला.  आता परिवार युवतीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत अताहे. या सिम्युलेशनमध्ये युवकाच्या आतड्याला नुकसान पोहोचले हे सिद्ध झाले तर युवतीला भरपाई द्यावी लागू शकते.

Advertisement
Tags :

.