For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मॅजिकल नव्हे केमिकल आहे प्रेम

06:02 AM Feb 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
मॅजिकल नव्हे केमिकल आहे प्रेम
Advertisement

मेंदूत चालणारी सायंटिफिक पार्टी

Advertisement

प्रेम काही जादू नव्हे तर मेंदू आणि हार्मोन्सचा एक वैज्ञानिक खेळ असल्याचे विज्ञान सांगते. हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या संशोधनानुसार डोपामाइन, ऑक्सिटोसिन यासारखी केमिकल्स माणसांना प्रेमाच्या जाळ्यात घेत असतात.

प्रेमात पडणे : काय असते हे ?

Advertisement

प्रेमात पडणे एक नैसर्गिक प्रक्रिया असून ती इवोल्युशनशी जोडलेली आहे. प्रेम आम्हाला साथीदार शोधणे, बंधन निर्माण करणे आणि अपत्यप्राप्ती करण्यासाठी प्रेरित करते. परंतु यामागे मेंदूत खोलवर रिवॉर्ड सिस्टीम आहे. जेव्हा आम्ही कुणाबद्दल आकर्षित होतो, तेव्हा मेंदूत रसायने सुटू लागतात, जी आनंद, उत्तेजना आणि ओढा निर्माण करतात. ही प्रक्रिया इतकी जलद होते की कधीकधी लव्ह अॅट फर्स्ट साइट होते.

लव केमिकल्स

प्रेमामागे अनेक लव  केमिकल्स असून ती मेंदू आणि शरीराला प्रभावित करतात. हे हार्मोन्स आणि न्यूरोट्रान्समीटर्स आहेत...

डोपामाइन : याला आनंदाचे रसायन म्हटले जाते. हे मेंदूच्या रिवॉर्ड सर्किटला सक्रीय करते, ज्याला आम्ही प्रेमाच्या नशाप्रमाणे जाणवतो. जेव्हा तुम्ही स्वत:च्या साथीदाराला पाहता, तेव्हा डोपामाइन वाढते. आनंदाची भरती येते, हेच रसायन व्यसनातही काम करत असल्याचे संशोधन सांगते.

 

ऑक्सिटोसिन : कडल हार्मोन किंवा प्रेमाचे हार्मोन म्हटले जाणारे ऑक्सिटोसीन आपुलकी आणि विश्वास निर्माण करते. जेव्हा तुम्ही गळाभेट घेता तेव्हा ऑक्सिटोसिन सुटते, जे परस्पर बंधनाला मजबूत करते. आईमुलांच्या नात्यातही हेच काम करते.

नॉरएपिनेफ्रिकन : हे उत्तेजना आणि एकाग्रता वाढविते. प्रेमात पडल्यावर हृदयाचे ठोके जलद होणे, घाम फुटणे हे सर्व यामुळे घडते. हे आम्हाला जोडीदारावर लक्ष केंद्रीत करायला लावते.

सेरोटोनिन : प्रेमाच्या प्रारंभी हे कमी होते, ज्यामुळे आम्ही जोडीदाराविषयी अधिक विचार करू लागतो नंतर हे संतुलित होते.

टेस्टोस्टेरोन आणि एस्ट्रोजन : हे आकर्षणाच्या टप्प्यात काम करते, जे शारीरिक इच्छा निर्माण करते. हे रसायन मेंदूच्या वेंट्रल टेगमेंटल एरिया, अमिगडाला, हिप्पोकँपस आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स यासारख्या हिस्स्यांना सक्रीय करते. एफएमआरआय स्कॅनद्वारे प्रेमात मेंदूचे 12 क्षेत्र एकत्रित काम करत असल्याचे कळते.

प्रेमाचे टप्पे : विज्ञानाच्या नजरेतून

वैज्ञानिक हेलेन फिशर यांच्यानुसार प्रेम तीन टप्प्यांमध्ये होते...

लस्ट (इच्छा) : हार्मोन टेस्टोस्टेरॉन आणि एस्ट्रोजनमुळे सुरू होते, हे शारीरिक आकर्षण आहे.

अट्रॅक्शन (आकर्षण) : डोपामाइन, नॉरएपिनेफ्रिन आणि सेरोटोनिनचा खेळ, तुम्ही जोडीदाराशिवाय राहू शकत नाही, झोप-भूक कमी होते.

अटॅचमेंट (ओढा) : ऑक्सिटोसिन आणि वासोप्रेसिनमुळे दीर्घ नाते तयार होते, हे विवाह किंवा एकत्र राहण्याचा पाया आहे.

प्रेम केवळ केमिकल्सचा खेळ आहे का?

केमिकल्स तर ट्रिगर आहे, परंतु प्रेमात संस्कृती, अनुभव आणि वैयक्तिक निवडही महत्त्वपूर्ण आहे. केमिकल्स आम्हाला आकर्षित करतात, परंतु नाते तयार करणे आमच्या मेहनतीवर निर्भर आहे. प्रेम मेंदूला बदलते, आनंद वाढवितो, तणाव कमी करतो, आरोग्य सुधारत असल्याचे संशोधन सांगते. प्रेमात पडणे मेंदूच्या रसायनांची कमाल आहे, जी आम्हाला आनंद आणि आत्मियतेची जाणीव करविते. परंतु खरे प्रेम केमिकल्सच्या पलिकडील असते, ते सन्मान, विश्वास आणि समंजसपणामुळे होते.

Advertisement
Tags :

.