महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘नीट’वरून संसदेत जोरदार गदारोळ

06:55 AM Jul 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

परीक्षा पद्धतीवर राहुल गांधींचे ‘प्रश्न’ : शिक्षणमंत्र्यांचे सडेतोड ‘उत्तर’

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी लोकसभेत ‘नीट-युजी’ पेपरफुटीच्या मुद्यावरून प्रचंड गदारोळ झाला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पेपर लीकवरून सरकारवर निशाणा साधला. त्यांनी देशाच्या परीक्षा पद्धतीला ‘फसवणूक’ असे म्हटले आहे. शिक्षणमंत्र्यांना आपल्या क्षेत्रात काय चालले आहे ते समजत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केल्यानंतर सरकारच्यावतीने शिक्षणमंत्र्यांनीही राहुल गांधींच्या आरोपांवर जोरदार प्रहार केला.

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान ‘नीट’मधील अनियमिततेवर बोलत असताना विरोधकांनी गदारोळ करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर शिक्षणमंत्र्यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे आणि न्यायालय जे काही निर्देश देईल त्याचे पालन करू. न्यायालयाने सर्व विद्यार्थ्यांचे शहर आणि केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्यास सांगितले होते. त्यानुसार पावले उचलण्यात आली असून अजूनही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले. त्यावर विरोधकांनी हस्तक्षेप करत संसदेत गदारोळ सुरू केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या मुद्यावर सरकारच्या कृतीवर नाराजी व्यक्त करत अनेक आरोप केले.

केवळ ‘नीट’च नाही तर अन्य परीक्षांच्या पद्धतीतही बऱ्याच समस्या असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. भारतीय परीक्षा पद्धती ही फसवी असल्याचे निदर्शनास येत आहे. परीक्षा पद्धतींमध्ये असलेल्या त्रुटींमुळे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत असल्याचा आरोपही करण्यात आला. राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ‘सध्याच्या शिक्षणाला, मूल्यांना आणि समाजजीवनाला देशातील जनतेची मान्यता मिळाली आहे. देशाची शिक्षणपद्धती योग्य असून केवळ आरडाओरडा करून सत्याचे खोट्यात रुपांतर करता येत नाही, असे  शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. ‘देशातील संपूर्ण परीक्षा व्यवस्थाच खराब आणि कचरा आहे...’ असे विरोधी पक्षनेत्यांनी म्हणणे दुर्दैवी आहे. सरकारच्यावतीने आम्ही त्याचा निषेध करतो, असेही त्यांनी पुढे सांगितले. विरोधी पक्षनेते आणि शिक्षणमंत्र्यांमध्ये झालेल्या या आरोप-प्रत्यारोपांदरम्यान सभागृहात जोरदार गदारोळ झाल्याचे दिसून आले.

Advertisement
Next Article