For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन्ही जिल्ह्यात कमळ फुलणार

10:06 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोन्ही जिल्ह्यात कमळ फुलणार
Advertisement

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचा विश्वास : श्रीमहालक्ष्मीच्या दर्शनानंतर प्रचार शुभारंभ

Advertisement

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘विकसीत भारत 2047’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गोव्यातील दोन्ही जिह्यात कमळे फुलवूया. डबल इंजिनच्या सरकारने केलेले कार्य आपणासमोर आहे. हे कार्य असेच सुऊ राहण्यासाठी दोन्ही उमेदवारांना भरघोस मतानी निवडून द्या, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. उत्तर गोव्यातून एक लाखापेक्षा अधिक, तर दक्षिण गोव्यातून 60 हजारांपेक्षा अधिक मताधिक्क्याने उमेदवार निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. येथील महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन भाजपाने काल मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या गोव्यातील दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह उत्तर गोव्याचे उमेदवार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपे, माजी खासदार विनय तेंडुलकर, मंत्री बाबूश मोन्सेरात, सुभाष फळदेसाई, सुदिन ढवळीकर, आलेक्स सिक्वेरा, सुभाष शिरेडकर, नीळकंठ हळर्णकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे, उपसभापती जोसुआ डिसोझा तसेच सत्ताधारी पक्षातील आजी, माजी आमदार, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन्ही मतदारसंघांत विजय

Advertisement

केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांच्या काळात गोव्याचा कशापद्धतीने विकास साधला, केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण योजना राज्य सरकारने अंत्योदय पातळीवर नेऊन तळागाळातील जनतेला त्यांचा कशाप्रकारे लाभ मिळवून दिला, याची माहिती प्रचारादरम्यान जनतेला पुन्हा एकदा देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाने ‘चारशे पार’चा नारा दिला आहे. राज्यातील दोन्ही जागा जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे स्वप्न साकार करण्यासाठी भाजप नेत्यांनी नेटाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पुढील काळात भाजपचे सर्वच नेते चाळीसही मतदारसंघ पुन्हा एकदा पिंजून काढतील आणि दोन्ही उमेदवारांना मोठ्या संखेने विजयी करतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

श्रीपादभाऊंनी काय केले नाही..?

श्रीपाद नाईक यांना ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्या त्या वेळी त्यांनी काय नाही केले ते सांगा. भारतातील पहिले आयुष इस्पितळ धारगळ येथे उभारण्यात आले, ही श्रीपादभाऊंची कमाल आहे. त्याच दर्जाची आणखी दोन इस्पितळे उभारली जातील. दोनापावला येथील सुशोभीकरणाची पायभरणी झाली.  राज्यातील प्रत्येक पंचायतीत आणि प्रत्येक मंदिरांमध्ये जाऊन विचारा श्रीपादभाऊनी काय केले ते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पल्लवींना मतदार स्वीकारतील

दक्षिण गोव्यातील उमेदवार पल्लवी धेंपे या सर्वानाच परिचित आहेत. सार्वजनिक क्षेत्रात त्यांचे मोठे काम आहे. त्यामुळे दक्षिण गोव्यातील मतदार त्यांना स्विकारतील यात शंकाच नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या पाच वेळा आपणास खासदार म्हणून निवडून दिले आहे. यावेळी आपल्यावर पुन्हा तोच विश्वास दाखवाल, अशी आशा उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केली. नरेंद्र मोदी सारखे दुरदृष्टी असलेले पंतप्रधान आपल्या देशाला लाभले आणि देशाची अर्थ व्यवस्था पाचव्या नंबरवर पोचली आहे. पुढील काळात ती दोन किंवा तीन नंबरवर पोचणार आहे. नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि पर्यायाने गोव्याचा विकास करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा संधी द्या असे आवाहन श्रीपाद नाईक यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.