For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पांगूळ गल्लीत लोटांगण होणार सकाळी

12:07 PM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
पांगूळ गल्लीत लोटांगण होणार सकाळी
Advertisement

पोलिसांसोबतच्या चर्चेनंतर निर्णय : भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

Advertisement

बेळगाव : होळीनिमित्त पांगूळ येथील अश्वत्थामा मंदिरासमोर दरवर्षी लोटांगण घातले जाते. यावर्षी चंद्रग्रहणामुळे या कार्यक्रमात काहीसा बदल करण्यात आला आहे. लोटांगण कार्यक्रम मंगळवार दि. 3 रोजी सकाळी ग्रहणापूर्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला. रविवारी मार्केट पोलिसांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा बदल करण्यात आला असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पांगूळ गल्ली पंच कमिटी व अश्वत्थामा युवक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. यावर्षी होळीनिमित्त सोमवार दि. 2 मार्च रोजी रात्री 10 वाजता होळी आणणे व पळविण्याचा कार्यक्रम होणार आहे.

मंगळवार दि. 3 रोजी पहाटे 5.30 वाजता होळीची पूजा केली जाणार आहे. दुपारनंतर चंद्रग्रहण असल्यामुळे लोटांगण सकाळी 8.30 ते 10.30 या वेळेत घातले जाणार आहे. ग्रहण सुटल्यानंतर सायंकाळी 7 वाजता श्रीफळ वाढविण्यात येईल. त्यामुळे भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पांगूळ गल्लीतील पंच कमिटीने केले आहे. रविवारी मार्केट पोलीस स्थानकात महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये होळी व रंगोत्सवासंदर्भात चर्चा करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या सूचनेनुसार काही बदल करण्यात आले. यावेळी मार्केट पोलीस स्थानकाचे एसीपी संतोष सत्यनाईक, जे. एम. कालिमिर्ची यासह इतर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.