आपल्याच आमदारांचा विश्वास गमावला
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत:च्या आमदारांचाच विश्वास गमवाला आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातील 50 टक्क्यांहून अधिक आमदार त्यांचा पक्ष सोडून गेले आहेत. केजरीवाल यांनी दिल्लीकरांना अनेक आश्वासने दिली आहेत. तथापि, त्यांच्यापैकी कोणतेही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेले नाही. त्यामुळे यावेळी त्यांना मतदार दणका देतील, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापनेची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी दिल्लीच्या मतदारांना केले. दिल्लीत 5 फेब्रुवारीला मतदान होत असून 8 फेब्रुवारीला मतगणना केली जाणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्य संघर्ष भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्ष यांच्यात आहे. काँग्रेसनेही सर्व मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. सोमवारी या निवडणुकांच्या जाहीर प्रचाराची सांगता झाली असून आता सर्व पक्ष मतदानाच्या दिवसाच्या प्रतिक्षेत आहेत. तीन्ही पक्षांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची आह