For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पतीला संपवले...आता आईलाही गमावले!

06:15 AM Jun 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
पतीला संपवले   आता आईलाही गमावले
Advertisement

पतीच्या खून प्रकरणी मुलीला अटक झाल्याने आईने केली आत्महत्या

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : मोटारसायकल अपघातात किरकोळ जखमी झालेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने सलाईनमधून विष देऊन खून करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. खून प्रकरणात मुलीला अटक झाल्याच्या मन:स्तापातून तिच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घोडगेरी, ता. हुक्केरी येथे उघडकीस आली आहे.

Advertisement

महादेवी मल्लाप्पा बदामी (वय 64) राहणार घोडगेरी असे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. यमकनमर्डी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. महादेवीची मुलगी सुमा संदीप मंजरगी, राहणार घोडगेरी हिला पतीच्या खून प्रकरणी यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी अटक केली होती.

दोन कोटी रुपयांची विमा रक्कम मिळविण्यासाठी आपल्या प्रियकराच्या मदतीने सुमाने झोपेच्या गोळ्या देऊन व सलाईनमधून विष देऊन पतीचा काटा काढला होता. या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. विधिविज्ञान प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांसह नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जावयाचा खून व या खून प्रकरणात मुलगी सुमाला झालेली अटक यामुळे झालेल्या मन:स्तापातून महादेवीने आत्महत्या केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. घरातील पंख्याला गळफास घेऊन तिने आपले जीवन संपविले आहे. यमकनमर्डी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.