For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हरवलेली सोन्याची चेन महिला पत्रकाराच्या प्रामाणिकपणामुळे परत

हरवलेली सोन्याची चेन महिला पत्रकाराच्या प्रामाणिकपणामुळे परत
Advertisement

पं. स. सदस्य जितू गावकर यांची हरवली होती सोन्याची चेन

Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

सावंतवाडी पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र उर्फ जितू गावकर यांची चार दिवसापूर्वी सावंतवाडी शहरात हरवलेली सुमारे दिड लाखाची सोन्याची चेन एका महिला पत्रकाराच्या सतर्क व प्रामाणिकपणामुळे त्यांना परत मिळाली. रेवती वालावलकर यांच्या या प्रामाणिकपणाचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आणि पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी कौतुक केले आहे.पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांची विठ्ठल मंदिर परिसरात चार दिवसापूर्वी चेन गहाळ झाली होती. पत्रकार रेवती वालावलकर यांना ही मौल्यवान सोन्याची चेन सापडली. त्यानंतर त्यांनी प्रथम परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली असता ती कुणाचीही नव्हती. त्यानंतर त्यांनी सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडे ती सोन्याची चेन सुपुर्द केली. जितेंद्र गावकर यांनी त्यावेळी शहरात शोधाशोध केली पण त्यांना हरवलेली चेन सापडली नाही. जितेंद्र गावकर सध्या पंचायत समितीच्या ट्रेनिंगसाठी पुणे येथे आहेत. त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ही चेन मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर आपली पत्नी सौ जागृती गावकर यांना कळवले. त्यानंतर सावंतवाडी पोलीस ठाण्यात या हरवलेल्या चेनची ओळख सौ जागृती गावकर यांच्याकडून पटवल्यानंतर रेवती वालावलकर यांनी पोलिसांच्या समक्ष ही चेन सौ. जागृती गावकर यांच्याकडे सुपूर्त केली. आपल्या पतीची हरवलेली मौल्यवान चेन प्रामाणिकपणे आणून दिल्याबद्दल जागृती गावकर यांनी पत्रकार रेवती वालावलकर यांचे आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.