हरवलेले-चोरीस गेलेले मोबाईल अथणी पोलिसांकडून मालकांना परत
12:47 PM May 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
917 पैकी 440 मोबाईल्सचा लावला शोध
Advertisement
बेळगाव : अथणी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी हरवलेले व चोरीस गेलेले 47 मोबाईल शोधून ते संबंधितांना परत केले आहेत. गेल्या दोन वर्षांत चोरीस गेलेल्या व हरवलेल्या 917 पैकी 440 मोबाईलचा शोध लागला असून यापैकी 344 मोबाईल संच ताब्यात घेऊन पोलिसांनी संबंधितांना परत केले आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुनवळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली 47 मोबाईल संबंधितांना परत करण्यात आले. उर्वरित मोबाईल शोधण्यासाठी पथक कार्यरत असल्याचेही पोलीसप्रमुखांनी सांगितले.
Advertisement
Advertisement