For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसएमएस-ईमेलद्वारे हरवलेले आधारकार्ड परत मिळणार

06:50 AM May 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
एसएमएस ईमेलद्वारे  हरवलेले आधारकार्ड परत मिळणार
Advertisement

आता युआयडीएआयकडून विविध सोपे मार्ग उपलब्ध

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आता देशात आधारकार्ड हे प्रत्येक कामासाठी एक आवश्यक दस्तऐवज बनले आहे, परंतु जर तुम्ही 12-अंकी क्रमांक विसरला असाल, तर तुमचे कार्ड कुठेतरी हरवले असेल, तर आता घाबरण्याची गरज नाही. कारण युआयडीएआयने अनेक सोपे मार्ग उपलब्ध करून दिले आहेत, ज्याद्वारे घरबसल्या हरवलेला संबंधीत आधार क्रमांक परत मिळवता येणार आहे. सदरचे काम हे वेबसाइट, एसएमएस, ईमेल आणि माय-आधार अॅपद्वारे काही मिनिटांत होते.

Advertisement

वेबसाइटद्वारे आधार क्रमांक मिळवण्याची प्रक्रिया

ल्ग्daग्.gदन्.ग्ह वेबसाइटवरील ‘माय आधार’ विभागात जा आणि ‘आधार क्रमांक मिळवा’ (Rाtrगन Aadप्aar ऱ्ल्स्ंाr) वर क्लिक करा. या पेजवर तुम्हाला आधार कार्डवरील नाव, मोबाईल नंबर आणि नंतर कॅप्चा टाकावा लागेल.

यानंतर ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करा. यानंतर तुमच्या फोनवर ओटीपी पाठवला जाईल, त्यानंतर तुम्हाला तो ओटीपी टाकून क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा सर्व तपशील मिळेल. तुम्ही तुमचे आधार कार्ड डाउनलोड देखील करू शकता. ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे.

आधार क्रमांक ईमेल किंवा आयव्हीआरएसद्वारे देखील तपासला जाऊ शकतो. वापरकर्त्यांनी gाtdाtaग्त्.aadप्aar@gस्aग्त्.म्दस् वर ईमेल करावा. विषय ओळीत नाव आणि पिन कोडसोबत युआयडी लिहा. तुम्हाला 24 तासांच्या आत प्रतिसाद मिळेल. त्याचवेळी, आयआरएसद्वारे 1947 वर कॉल करा व्हॉइस कमांडचे पालन करा आणि आधार तपशील ऐका. हा पर्याय वृद्ध किंवा कमी तंत्रज्ञान-कुशल लोकांसाठी चांगला आहे.

जर नोंदणीकृत मोबाईल किंवा ईमेल नसेल तर काय करावे?

अशा स्थितीत जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्या.मार्गदर्शनासाठी तुम्हाला युआयडीएआयच्या हेल्पलाइन 1947 वर देखील कॉल करता येऊ शकतो.

Advertisement
Tags :

.