महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रारंभीची तेजी गमावत बाजार घसरणीत

06:49 AM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 808 अंकांनी घसरला: निफ्टी 25,000 च्या जवळ

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

चालू आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 4 ऑक्टोबरला सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रात बाजाराची सुरुवात उसळीने झाली होती. पंरतु तेजीचा आलेख कायम ठेवण्यात बाजाराला अपयश आले आहे.

बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 808.65 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक   81,688.45 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 235.50 अंकांनी घसरून 25,014.60 वर बंद झाला.

विश्लेषकांचे असे मत आहे की, मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे निर्माण होणारी चिंता लक्षात घेता, सर्वोच्च तेल उत्पादक देशांकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास तेलाच्या किमती वाढतील आणि त्याचा परिणाम भारतासारख्या आयातदार देशांवर दिसून येईल, असे मानले जात आहे. कच्च्या तेलासाठी भारत पूर्णपणे इतर देशांवर अवलंबून आहे.

दरम्यान, ब्रेंट क्रूडची किंमत 78.62 वर पोहोचली आहे. 3 ऑक्टोबरच्या ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात कच्च्या तेलाच्या किमतीत 5 टक्क्यांनी वाढ झाली.

आयटी आणि पीएसयू बँकेचे समभाग चमकले

विविध क्षेत्रांच्या निर्देशांकाबद्दल बोलायचे झाल्यासे फक्त दोन क्षेत्रे तेजीसह बंद झाली. आयटी समभागांबद्दल, इन्फोसिस, विप्रो, कोफोर्ज आणि टेक महिंद्राच्या पाठीमागे निफ्टी आयटी 0.36 टक्क्यांनी वाढला. इन्फोसिसचा समभाग टॉपच्या यादीत आहे. भारतीय आयटी कंपन्या त्यांचे सप्टेंबर तिमाही कमाई अहवाल जारी करणार आहेत.

मंदीचा परिणाम दिसणाऱ्या क्षेत्रांमध्ये एफएमसीजी, ऑटो, मीडिया, रियल्टी यांचा समावेश आहे. ते सर्व 1 टक्क्यापेक्षा जास्त घसरले. दिवसाचा शेवट मंदीच्या बाजूने झाला कारण निफ्टी-50 मधील 50 पैकी 37 समभाग घसरत बंद झाले. महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फायनान्स, नेस्ले इंडियाचे समभाग घसरले.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article