For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्री गणेश चतुर्थीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेस पारंपरिक सुवर्ण अलंकारांचा साज

06:16 PM Sep 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
श्री गणेश चतुर्थीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेस पारंपरिक सुवर्ण अलंकारांचा साज
Advertisement

पंढरपूर: श्री गणेश चतुर्थीच्या मंगलमय पर्वानिमित्त पंढरपूर येथील मंदिरात श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस आकर्षक पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. अलंकारांनी नटलेले विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मनोहारी रूप पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

Advertisement

श्री विठ्ठलास सोन्याची पगडी, कौस्तुभ मणी, दंडपेट्या जोड, हिऱ्याचे कंगन, नाम निळाचा, शिरपेच, मोत्याच्या एक व दोन पदरी कंठी, मत्स्य जोड, सोन्याचा पितांबर, शालिग्राम हार, तोडे, हायकोल, नऊ पदरी व पाच पदरी चंद्रहार, तुळशीची एक पदरी माळ तसेच चार पदरी मोहरमाळ आदी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले.

रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जाव्याच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी आणि कंबरपट्टा आदी सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले.

Advertisement

पारंपरिक अलंकारांमुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे रूप अधिकच विलोभनीय आणि भक्तिमय दिसत आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मंदिरात आलेल्या भाविकांना या विशेष अलंकारिक रूपाचे दर्शन घेण्याची संधी मिळत असून, भाविकांमध्ये या सजावटीचे विशेष आकर्षण निर्माण झाले आहे.

Advertisement
Tags :

.