कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डॉक्टरांचे नाव सांगून रुग्णांची लूट

11:48 AM Nov 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सिव्हिलमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कारभार ; बिम्स संचालकांकडून कारवाई

Advertisement

बेळगाव : गोरगरिबांसाठी असणाऱ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून रुग्णांची लूट होत असल्याची बाब सामाजिक कार्यकर्त्यांकडून निदर्शनास आणून देताच बिम्स संचालकांनी कारवाईचा बडगा उगारून दोघा कंत्राटी कर्मचाऱ्यांना निलंबित केले. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करून नवीन कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, अशी सूचना कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सीला केली. दरम्यान कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती करण्यात आली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या अनगोळ येथील रुग्णाच्या कुटुंबीयांकडून ऑपरेशनसाठी 10 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. याबाबत सदर रुग्णाच्या कुटुंबीयांनी बिम्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची माहिती समाजसेवक विजय मोरे यांना दिली होती. तसेच कर्मचाऱ्याला यापूर्वी पाच हजार रुपये देण्यात आले होते. उर्वरित पाच हजार रुपये ऑपरेशन झाल्यानंतर देण्याचे ठरविण्यात आले होते. याबाबतचा फोनवरील संवाद विजय मोरे यांच्या स्वाधीन केला होता. ही गंभीर बाब लक्षात घेत रुग्णालयामध्ये गोरगरिबांची होणारी लूट पाहून विजय मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बिम्स संचालक अशोक कुमार शेट्टी यांची भेट घेऊन हा प्रकार निदर्शनास आणून दिला.

Advertisement

दरम्यान संचालक अशोक कुमार शेट्टी यांनी प्रसूती विभागाच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना तातडीने बोलावून घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांची माहिती घेतली. कंत्राटी तत्त्वावर नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांकडून डॉक्टरांचे नाव सांगून पैसे उकळले असल्याचे मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरून निदर्शनास आले. ही बाब गांभीर्याने घेत अशोक शेट्टी यांनी तत्काळ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा आदेश दिला. याबरोबरच याची सखोल माहिती घेण्यासाठी संबंधितांची चौकशी करण्यात येईल. या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी माजी महापौर विजय मोरे, माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, माजी उपमहापौर संजय शिंदे, सुनील बाळेकुंद्री, माजी नगरसेवक दीपक जमखंडी आदींनी याबाबत जोरदार आवाज उठविला. दरम्यान अशोक शेट्टी यांनी असे प्रकार रोखण्यासाठी तातडीने पावले उचलली जातील. संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांची लवकरच बैठक घेऊन रुग्णांची होणारी लूट रोखण्यात येईल, असे प्रकार घडल्यास कोणताही मुलाहिजा न राखता कारवाई करू, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी रुग्णांना आवश्यक औषधे रुग्णालयातून पुरविण्यात यावीत, बाहेरील औषधे लिहून देण्यात येऊ नयेत, असे सांगितले. तर रुग्णालयात कोणाकडूनही पैसे मागितल्यास बिम्स संचालकांकडे तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात आले.

डॉक्टरांचे नाव सांगून कर्मचाऱ्यांची चांदी

रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी नेमणूक करण्यात आले आहेत. सदर कर्मचारी डॉक्टरांचे नाव सांगून गोरगरीब रुग्णांकडून यापूर्वीही पैसे उकळले असल्याची बाब उपस्थित डॉक्टरांनी बैठकीत मांडली. तसेच प्रसूती विभागाच्या महिला डॉक्टरांकडूनही डॉक्टरांचे नाव सांगून पैसे उकळण्यात येत असल्याचे सांगितले. यावरून बिम्स संचालक अशोक कुमार शेट्टी यांनी तातडीची बैठक घेणार असल्याचे सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article