महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ग्राम वन चालकांकडून जनतेची लूट

11:14 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रेशनकार्डात नाव समावेश करण्यास 50 रुपये शुल्क असताना,  500 रुपयांची आकारणी : गाव पातळीवरील केंद्र चालकांकडून जनतेची लूट

Advertisement

बेळगाव : नवीन रेशनकार्ड मिळविण्यासाठी अनेक जणांकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मात्र सरकारकडून रेशनकार्ड वितरणाला अद्याप हिरवा कंदील दाखविण्यात आला नाही त्यामुळे नवीन रेशनकार्डच्या वितरणाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. अशामध्ये रेशनकार्डात नावे समावेश करण्यास सरकारने अनुमती दिली आहे. मात्र ग्राम वन सेवा देणाऱ्या गाव पातळीवरील केंद्र चालकांकडून ग्रामीण भागातील जनतेची लूट चालविली आहे. रेशन कार्डात नाव समावेश करण्यास 50 रुपये शुल्क असताना 500 रु. आकारणी केली जात आहे.

Advertisement

राज्य सरकारकडून नवीन रेशनकार्ड वितरणाला अद्याप स्थगिती दिली आहे. त्यामुळे रेशनकार्डामध्ये असलेल्या दुरूस्तीसाठी परवानगी दिली आहे. रेशनकार्डामध्ये पत्ता बदलणे, नवीन नावांचा समावेश करणे, नावे कमी करणे, नावातील झालेली चूक दुरूस्ती करणे, मोबाईल लिंक यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार हे काम गावपातळीवर ग्रामीण भागातील जनतेला सरकारी सेवांचा लाभ करून देण्यास ग्राम वन सेवा सुरू केली. या माध्यमातून रेशनकार्ड दुरुस्तीची कामे करून घेण्यासाठी सोय आहे. मात्र सदर केंद्र चालकांकडून ग्रामीण भागातील जनतेची अक्षरश: लूट चालविली आहे. रेशनकार्डमध्ये नाव समावेश करण्यासाठी 50 रुपये शुल्क असताना ग्रामवन चालकांकडून 500 रुपये शुल्क आकारले जात आहे. यामुळे या माध्यमातून ग्रामवन चालकांनी ग्रामीण भागातील जनतेची दिशाभूल करून लूट चालविली आहे. जाब विचारणाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल केली जात आहे.

ग्राम वन चालकांची मनमानी

याबाबत ग्रामस्थांकडून ग्राम पंचायतीकडे तक्रार कण्यात आली असली तरी ग्राम वन चालकाची मनमानी सुरू आहे. ही परिस्थिती केवळ एकाच गावात नसून तालुक्यांच्या गावांमध्ये सारखीच आहे. यासाठी ग्राम वन चालकांकडून दिल्या जाणाऱ्या विविध सेवांसाठी आकारले जाणारे शुल्कपटी केंद्रामध्ये लावण्यात यावी, याची सक्ती करण्यात यावी व जनतेची होणारी लूट थांबविण्यात यावी. अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

अगसगे ग्राम वन चालकाचा कारभार 

अगसगे येथील ग्राम वन चालकाबाबत आलेल्या तक्रारीवरून चौकशी केली असता रेशनकार्डात नाव समावेश करण्यासाठी 500 रुपये शुल्क आकारले जात असल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले. तहसीलदारांकडे चौकशी केली असता यासाठी केवळ 50 रुपये शुल्क असल्याचे सांगण्यात आले.

ग्राम वनचा पासवर्ड घेऊन सायबर चालकांची चांदी 

रेशनकार्ड दुरूस्ती करण्यासाठी केवळ ग्रामवन चालकांना लॉगिंइन आईड देण्यात आला आहे. मात्र शहरातील सायबर चालक ग्राम वन चालकांचा लॉगिंइन आईड व पासवर्ड घेऊन रेशनकार्ड दुरूस्ती करून देण्यात येत आहे. यासाठी ही 500 रुपये शुल्क आकारले जात आहे. या मध्यमातून सायबर चालकांची चांदीच चांदी सुरू आहे.

...तर ग्राम वन चालकावर कायदेशीर कारवाई 

ग्रामीण भागात असणाऱ्या ग्राम वन चालकांकडून सरकारी नियमानुसार शुल्क आकारून सेवा देणे आवश्यक आहे. मात्र ग्रामीण भागातील जनतेकडून अधिक शुल्क आकारल्यास संबंधीत ग्राम वन चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

 - तहसीलदार बसवराज नागराळ.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article