महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टोळी मुकादम-ठेकेदारांकडून शेतकऱ्यांची लूट

10:05 AM Dec 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ऊसतोड कामगार मिळविण्यासाठी ठेकेदारांची पाठराखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ

Advertisement

वार्ताहर /धामणे

Advertisement

नंदीहळ्ळी, नागेनहट्टी, धामणे या भागातील शेतकऱ्यांनी ऊसतोडणीच्या कामाची सुरुवात केली असून ऊसतोडणी टोळी ठेकेदार आणि टोळी मुकादम शेतकऱ्यांची लूट करत असल्याचे या भागातील शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. यंदा पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सर्वच पावसाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील शेतकरी मोठ्या नुकसानीत असताना नंदिहळ्ळी, नागेनहट्टी व धामणे भागातील शेतकऱ्यांनी ऊस तोडणीसाठी ऊसतोड कामगार मिळविण्यासाठी ठेकेदारांची पाठराखण करून ऊसतोड टोळी मिळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना बरीच पळापळ करावी लागत आहे. ठेकेदार टोळीच्या मुकादमला शेतकऱ्यांची गाठ घालून दिल्यानंतर दिवस ठरवून ऊस तोडणीला सुरुवात करण्यात येते, अशी माहिती धामणे येथील शेतकरी संदीप पिराजी पाटील यांनी दिली. त्यानी ऊसाविषयी सांगितले की, 92 चंदगड आणि 3102 या जातीच्या उसाची लागवड धामणे भागातील शेतकऱ्यांनी केली असून एक एकरला 50 ते 60 टन ऊस यावर्षी मिळत असल्याचे सांगितले. यापूर्वी धामणे भागातील शेतकरी उसाची लागवड करत नसत. परंतु गेल्या तीन वर्षात 30 ते 35 टक्के शेतकरी उसाची लागवड करत आहेत. कारण आमची शेतजमीन ही भात पिकाऊ जमीन आहे. परंतु हल्ली पावसाचे प्रमाण योग्य नाही. एक वर्षी जास्त पाऊस पडून भातपीक वाया जात आहे. तर एक वर्षी पाऊस कमी पडून भातपीक येत नाही. त्यामुळे ऊस पीक हे दोन्ही बाजूनी मिळत असल्याचे सुदर्शन पाटील या शेतकऱ्याने सांगितले.

भागात 70 ते 80 टक्के उसाची लागवड

नंदिहळ्ळी व नागेनहट्टी भागातील शेतकऱ्यांनी गेल्या 10 ते 12 वर्षापासून ऊस पिकाची लागवडीचे प्रमाण वाढविले असून आता या भागात 70 ते 80 टक्के उसाची लागवड करत असल्याचे नंदिहळ्ळी येथील शेतकरी सिद्राय जाधव यांनी सांगितले. परंतु ऊसतोडणीसाठी कामगारांचे ठेकेदार व ऊसतोड टोळीचे मुकादम मागील वर्षापेक्षा बराच दर वाढवून घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे सिद्राय यांनी सांगितले. दरवाढीचे कारण यंदा कायमच ढगाळ वातावरण असल्याने पाऊस अचानक पडला तर ऊसतोडणी थांबते. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे ठेकेदारांचे फावले असल्याचे सांगण्यात आले. या भागातील ऊसतोडणीला आताच सुरुवात झाली असून हे काम अजून जानेवारी महिना पूर्ण व फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत चालेल, असे येथील शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article