मानेवर कोयता ठेवत 3 लाखांचा ऐवज लुटला
मंडणगड :
सडे-मानेवाडी येथे तोंडावर रुमाल बांधून स्वयंपाकघराच्या खिडकीतून घरात प्रवेश केलेल्या तिघा अज्ञातांनी घरमालकाच्या मानेवर कोयता ठेवत, हातपाय बांधून रोख रक्कम व सोन्याच्या साखळीसह 2.91 लाखाचा ऐवज लुटला. 9 एप्रिल रोजी रात्री 2.30 च्या सुमारास फिल्मी स्टाईने घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात तिघा अज्ञातांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद नंदकिशोर परशुराम माने (65, सडे-मानेवाडी) यांनी दिली आहे. मंडणगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 रोजी माने आपल्या घरी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जेवण आटोपून त्यांचे बेडऊममध्ये झोपी गेले. मध्यरात्री 2 ते 2.30 वाजण्याच्या सुमारास तोंडावर ऊमाल बांधलेल्या तीन अज्ञात इसमांनी माने यांच्या स्वयंपाक घराची स्लायडींग खिडकी सरकवून घरात प्रवेश केला. याचवेळी खिडकी सरकवण्याच्या आवाजामुळे जागे झालेले माने हे बेडवऊन उठण्याचा प्रयत्न करत असताना तोंडावर ऊमाल बांधलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांना पकडून त्यांचे हात व पाय टॉवलेच्या मदतीने बांधले. त्यांच्या मानेवर घरातील कोयती ठेवून ‘जर तू ओरडण्याचा प्रयत्न केलास तर तुला ठार माऊ’ अशी धमकी दिली. त्यानंतर तिघांनी त्यांच्या तोंडावर चादर टाकून बेडऊममधील कपाटमध्ये ठेवलेली रोख रक्कम व उशाखाली ठेवलेली सुमारे चार तोळे सोन्याची घेऊन पलायन केले.
या जबरी चोरीत माने यांच्या घरातील रोख रूपये 55 हजार रुपयांची रोख रक्कम व 2 लाख 36 हजार रुपये किंमतीची 4 तोळ्याची साखळी चोरट्यांनी लांबवली. मंडणगड पोलीस ठाण्यात या अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 309(4), 305, 331(4), 351(2)(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुह्याचा अधिक तपास सुरु आहे.