For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हल्ल्यानंतर ईडीकडून लुकआऊट नोटीस

06:44 AM Jan 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
हल्ल्यानंतर ईडीकडून लुकआऊट नोटीस
Advertisement

वृत्तसंस्था / कोलकाता

Advertisement

शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये धाड टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्यानंतर शनिवारी तृणमूल काँग्रेसचे नेते शहाजहान शेख यांच्या विरोधात ईडीने लुकआऊट नोटीस काढली आहे. त्यामुळे शेख यांना देश सोडणे कठीण होणार आहे. देशातील सर्व विमानतळांवर या नोटीसीप्रमाणे कारवाई केली जाते.

शेख हे देशाबाहेर पळून जातील अशी शक्यता असल्याने ही लुकआऊट नोटीस काढण्यात आली आहे. शुक्रवारच्या हल्ल्यात ईडीचे तीन अधिकारी गंभीररित्या जखमी झाले होते. तसेच ईडीच्या अनेक वाहनांची मोडतोड करण्यात आली होती.   ईडीने या हल्ल्यासंदर्भात तीन एफआयआर सादर केले आहेत. लवकरच अनेकांची धरपकड होण्याची शक्यता आहे. लुकआऊट नोटीसीची माहिती सर्व विमानतळांना देण्यात आली असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Advertisement

आरएफएल प्रकरणीही छापे

रेलिगेअर फिनव्हेस्ट या वित्त कंपनीवर मनी लाँड्रींगचा आरोप असून या प्रकरणी ईडीने तपास पूर्ण केला असल्याचे स्पष्ट केले आहे. हा 2 हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे. शुक्रवारी या कंपनीच्या कार्यालयांवर धाडी घालण्यात आल्या होत्या. तसेच या कंपनीच्या अनेक उपकंपन्यांच्या आस्थापनांवरही छापे टाकण्यात आले होते. एमथ्रीएम इंडिया होल्डिंग, आरएचसी होल्डिंग, हिलग्रो इन्फ्रास्ट्रक्चर आणि डायन ग्लोबल सोल्युशन्स तसेच प्रियस कमर्शिअल या कंपन्यांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. या धाडींमध्ये कंपनीने ईडीला सर्व प्रकारचे साहाय्य केले आहे, असा दावा कंपनीच्या व्यवस्थापनाने नंतर पत्रकारांसमोर केला आहे.

Advertisement
Tags :

.