महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रज्ज्वल यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस

07:00 AM May 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विमानतळावरून ताब्यात घेण्यासाठी एसआयटीच्या हालचाली : तपास गतिमान

Advertisement

बेंगळूर : लैंगिक शोषण प्रकरणी हासनचे निजद खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याविरोधात एसआयटीने लुकआऊट नोटीस जारी केली आहे. चौकशीसाठी हजर होण्यासाठी एसआयटीने नोटीस बजावल्यानंतर फेसबुक पोस्ट वगळता प्रज्ज्वल यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. लैंगिक शोषणासंबंधीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या शिफारसीवरून राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली होती. त्यानंतर लागलीच एसआयटीने तपासाला गती देत प्रज्ज्वल यांना नोटीस बजावून 24 तासांच्या आत चौकशीला हजर राहण्याची सूचना दिली होती. मात्र, प्रज्ज्वल यांनी विदेश दौऱ्यावर असल्याने चौकशीला हजर होण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्याची विनंती वकिलांमार्फत एसआयटीकडे केली होती. दरम्यान, गुरुवारी एसआयटीने प्रज्ज्वल यांचा शोध घेण्यासाठी लुकआऊट नोटीस विमानतळांना पाठविल्या आहेत. प्रज्ज्वल विदेशातून येताच त्यांना ताब्यात घेण्याचा उल्लेख नोटिसीत करण्यात आला आहे. लुकआऊट नोटीस बजावून देखील प्रज्ज्वल  यांचा शोध न लागल्यास त्यांच्याविरुद्ध न्यायालयाकडून विनाजामीन वॉरंट काढण्यात येण्याची शक्यता आहे.

Advertisement

एच. डी. रेवण्णा अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात

खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या अश्लील चित्रफीत प्रकरणात आरोपी असणाऱ्या निजद आमदार एच. डी. रेवण्णा यांनाही अटकेची भीती आहे. त्यामुळे त्यांनी गुरुवारी अटकपूर्व जामिनासाठी बेंगळूरच्या सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. हासन जिल्ह्याच्या होळेनरसीपूर येथे दाखल झालेल्या एफआयआरसंबंधी एच. डी. रेवण्णा हे देखील चौकशीला हजर झालेले नाहीत. त्यामुळे रेवण्णा पिता-पुत्राने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. प्रज्ज्वल यांनी तीन दिवसांपूर्वीच न्यायालयात याचिका दाखल केली होती.

माजी कारचालकालाही नोटीस

या प्रकरणात चर्चेत आलेला प्रज्ज्वल यांचा माजी कारचालक कार्तिक याच्याविरुद्धही एसआयटीने नोटीस जारी केली आहे. कार्तिकने प्रथम या प्रकरणात प्रतिक्रिया देताना आपण चित्रफितीची पेनड्राईव्ह वकील देवराजेगौडा यांच्याकडे दिली होती. चित्रफिती आपण व्हायरल केलेल्या नाहीत, असे सांगितले होते. त्यामुळे त्यालाही चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध एफआयआरही दाखल झाला आहे.

व्हिडिओ सर्वप्रथम कोणी उघड केला?

खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या कथित अश्लील चित्रफिती कोणी उघड केल्या, याविषयी गूढ निर्माण झाले होते. अखेर हे गुढ उकलले आहे. प्रज्ज्वल यांच्याकडे पूर्वी कारचालक म्हणून काम केलेल्या कार्तिक याने सर्वप्रथम व्हिडिओ व्हॉट्सअॅपद्वारे पाठविल्याचे स्पष्ट झाले आहे. कार्तिकने मंत्री जमीर अहमद खान यांचा निकटवर्तीय असलेला काँग्रेस कार्यकर्ता नवीन गौडा याला व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. व्हिडिओ हाती लागताच नवीनगौडा याने प्रज्ज्वल यांच्या व्हिडिओसाठी हे व्हॉट्सअॅप चॅनल फॉलो करा, असा मजकूर फेसबूक पेजवर टाकला होता. त्यानंतर काही वेळातच ‘प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या अश्लील व्हिडिओसाठी प्रतीक्षा’ अशा आशयाचा दुसरा मजकूर पोस्ट केला होता. ही बाब नजरेस येताच निजदच्या कार्यकर्त्यांनी स्क्रिनशॉट काढून पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल होताच नवीन गौडा याने फेसबूक अकाऊंट डिलिट केले. आता एसआयटीने नवीन गौडा याला 4 मे रोजी चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article