महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सर्वात लांब केस

06:26 AM Aug 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

माणसाच्या डोक्यावरचे केस जास्तीत जास्त किती लांब असू शकतील, असा प्रश्न विचारल्यास विविध उत्तरे मिळण्याची शक्यता आहे. पण 10 ते 15 फुटांच्या वर अनुमान व्यक्त पेले जाण्याची शक्यता नाही. मात्र आफ्रिकेतील एक महिला आशा मंडेला यांनी यासंबंधात नवा विक्रम केला असून त्यांच्या केसांची लांबी तब्बल 19 फूट साडेसहा इंच इतकी असल्याची नोंद गिनिज विक्रम पुस्तिकेत करण्यात आली आहे. थोडीथोडकी नाही, तर गेली 40 वर्षे त्या आपल्या केसांची निगा राखत असून या कालावधीत एकदाही त्यांनी केसांना कात्री लावलेली नाही.

Advertisement

सुंदर आणि घट्ट केसांची निसर्गदत्त देणगी त्यांना लाभलेली आहे. त्यामुळे त्यांना केस गळण्याच्या समस्येचा त्रास नाही. मात्र, त्यांनी प्रयत्न करुन आणि केसांची व्यवस्थित निगा राखून निसर्गाने दिलेली ही देणगी उत्तम रितीने जोपासली आहे. इतके लांब केस चालताना जमीनीवर घासले जाऊ नयेत म्हणून त्या काम करताना केसांचा अंबाडा बांधतात. पण त्या अंबाड्याचे वजनही इतके असते की त्या दोन तासांच्या वर ते सहन करु शकत नाहीत. त्यामुळे दिवसातून अनेकदा त्यांना केस मोकळे सोडावे लागतात. झोपलेल्या अवस्थेतही केसांना धक्का लागू नये यासाठी त्यांनी शयनकक्षात विषेश व्यवस्था करुन घेतली आहे. त्यांचे वय आज 62 वर्षांचे आहे. वयाच्या 22 व्या वर्षापासून त्यांनी केस वाढविण्याचा छंद जोपासला आहे.

Advertisement

एवढे लांब केस वाढविण्याचे त्यांचे कारणही वैशिष्ट्यापूर्ण आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या 40 वर्षांपूर्वी त्यांच्या स्वप्नात एक भलामोठा नागसाप येत असे. तो त्यांच्यासमोर फणा काढून बसत असे आणि त्यांच्याशी बोलत असे. त्याच्याच संदेशावरुन आपण केस वाढविण्याचे हे ‘व्रत’ घेतले असल्याचे प्रतिपादन त्या करतात. एवढे लांब वाढलेले आणि काही प्रमाणात त्यांच्यासाठी समस्या बनलेले हे केस कापण्याची आपली कोणतीही योजना नाही. जितका काळ अजूनी शक्य आहे, तितका काळ ते वाढविणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी आपल्या या केसांसंबंधीची माहिती सोशल मिडियावरुन प्रसारित केली असून या हा व्हिडीओ लक्षावधी लोकांनी पाहिलेला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article