For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

National Common Mobility Card | मोफत प्रवास बंद होणार? अफवेमुळे सोलापूर बसस्थानकात ज्येष्ठांची मोठी गर्दी

02:00 PM Jul 02, 2026 IST | NEETA POTDAR
national common mobility card    मोफत प्रवास बंद होणार  अफवेमुळे सोलापूर बसस्थानकात ज्येष्ठांची मोठी गर्दी
Advertisement

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाकडून १ मार्चपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, हे डिजिटल कार्ड मिळवण्यासाठी सोलापूर बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, अनेकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. तांत्रिक अडचणी, मर्यादित नोंदणी व्यवस्था आणि नियोजनाच्या अभावामुळे बसस्थानकांवर दररोज मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.

Advertisement

राज्य शासनाने एनसीएमसी कार्ड काढणे सध्या अनिवार्य केलेले नाही. सर्व सवलतधारकांची नोंदणी पूर्ण होईपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना जुन्या पद्धतीनेच प्रवास सवलतीचा लाभ मिळत राहणार आहे. तरीही "कार्ड नसल्यास मोफत प्रवास बंद होईल" अशा अफवा आणि अपुऱ्या माहितीमुळे अनेक ज्येष्ठ नागरिक सकाळपासूनच बसस्थानकात रांगा लावत आहेत.

विशेष म्हणजे, अनेक ज्येष्ठ नागरिक पहाटेपासून बसस्थानकात येऊन आपला क्रमांक लागण्याची वाट पाहत आहेत. मात्र, नोंदणी प्रक्रियेला वेळ लागत असल्याने त्यांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Advertisement

दरम्यान, एसटी प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, एनसीएमसी कार्ड नसले तरी सध्या सवलतीच्या प्रवासावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी गर्दी टाळून आपल्या सोयीने नोंदणी करून घ्यावी, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.