For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लंडन न्यायालयाचा नीरव मोदीला धक्का

06:44 AM Jun 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
लंडन न्यायालयाचा नीरव मोदीला धक्का
Advertisement

100 कोटी रुपये बँक ऑफ इंडियाला परत करण्याचे आदेश

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला एका ब्रिटिश न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. लंडन उच्च न्यायालयाने बँक ऑफ इंडियाच्या बाजूने निकाल देताना, नीरव मोदीला बँकेचे 10.7 दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच 100 कोटी रुपयांहून अधिकच्या कर्जप्रकरणी जबाबदार धरले आहे. लंडन कमर्शियल कोर्टाचे न्यायाधीश सायमन टिंकलर यांनी मंगळवारी निकाल देताना नीरव मोदीने बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या कर्जासाठी वैयक्तिक हमी दिलेली रक्कम परत करण्यासाठी कायदेशीररित्या जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार आता त्याच्या दुबईस्थित कंपनीशी संबंधित कर्ज वसुलीच्या वादामध्ये त्याला बँक ऑफ इंडियाला 10.7 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (100 कोटी रुपयांपेक्षा जास्त) देण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Advertisement

नीरव मोदीवर मूळ रक्कम म्हणून अंदाजे 4.1 दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच अंदाजे 38.9 कोटी रुपये देणे आहे. शिवाय, बँकेने ठरवलेल्या नियमांनुसार या रकमेवर व्याजही आकारले जाईल. नीरव मोदीने बँकेच्या दाव्याला न्यायालयात आव्हान दिले होते. बँकेने दिलेली वैयक्तिक हमी अंमलबजावणीयोग्य नाही, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला होता. तथापि, न्यायाधीश सायमन टिंकलर यांनी नीरव मोदींचे युक्तिवाद फेटाळून लावत याचिका निकाली काढली.

Advertisement
Tags :

.