महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कोट्यवधींच्या कार साखळदंडात कैद

07:00 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लंडनमध्ये लोकांचा अजब जुगाड

Advertisement

लोक स्वत:च्या वाहनाच्या सुरक्षेसाठी खूप काही करत असतात. घराच्या परिसरात गॅरेज तयार करवितात, सीसीटीव्ही पॅमेरे लावून घेतात. अनेक लोक तर सुरक्षा रक्षकही नियुक्त करतात, जो गाडी आणि घराची देखभाल करू शकेल. परंतु कधी तुम्ही पाळीव प्राण्यांप्रमाणे कारला साखळदंडात बांधून ठेवल्याचे पाहिले आहे का? भारतात हे दृश्य तुम्हाला कुठेच दिसून येणार नाही, परंतु लंडनमध्ये लोक स्वत:च्या कोट्यावधींच्या कार्सना साखळदंडात बांधून ठेवत आहेत. लंडनमध्ये लँड रोव्हर वाहनांचे मालक स्वत:च्या वाहनांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त खबरदारी घेत आहेत. लंडनमध्ये सध्या लँड रोव्हर वाहनांच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे लोक वाहनाच्या सुरक्षेवरून अत्यंत त्रस्त झाले आहेत. अलिकडेच एक छायाचित्र व्हायरल झाले असून यात एक लँड रोव्हर कारच्या मालकाने स्वत:च्या कारला झाडाशी साखळदंडाने बांधून ठेवल्याचे दिसून येत होते.

Advertisement

इंडस्ट्रीयल चेनला दोनवेळा झाडाला गुंडाळून कार बांधून ठेवण्यात आली होती. मागील महिन्यात जग्वार-लँड रोव्हरने स्वत:च्या कार्सच्या चोरीला रोखण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचे म्हटले आहे. लेक्सस आरएक्स नावाची कार मागील वर्षी सर्वाधिक चोरीला जाणारी कार ठरली होती. लँड रोव्हरच्या या कार्स सहजपणे चोरीला जाऊ शकतात असा दावा केला जात आहे. यामुळे कंपनी आता कारच्या सुरक्षा सिस्टीमला सुधारण्यासाठी मोठी गुंतवणूक करत आहे. चावीशिवाय एंट्रीच्या सुविधेमुळे चोर सहजपणे ही कार चोरत असल्याचे तपासातून समोर आले आहे. ब्रिटनमध्ये 2023 मध्ये लँड रोव्हरच्या ज्या 3 मॉडेल सर्वाधिक चोरीला गेल्या, त्यात रेंज रोव्हर स्पोर्ट, रेंज रोव्हर इवोक, लँड रोव्हर डिस्कव्हरी स्पोर्ट सामील आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article