For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : सख्या बहिणींवर काळाचा घाला! 

05:49 PM Jun 09, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
satara news   सख्या बहिणींवर काळाचा घाला  
Advertisement
                                               दोघींचा जागीच मृत्यू, भाऊ गंभीर; चौधरवाडी येथे भीषण अपघात
Advertisement

लोणंद: मामाच्या गावाला जाण्यासाठी आनंदाने घराबाहेर पडलेल्या तीन भावंडांवर काळाने घाला घातला. निरामोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे शनिवारी (दि. ६) सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन सख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला लहान भाऊ गंभीर जखमी झाला.

या हृदयद्रावक घटनेमुळे फलटण तालुक्यातील मुरूमसह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुरूम (ता. फलटण) येथील सेजल ज्ञानेश्वर बोडरे (वय १७), अक्षरा ज्ञानेश्वर बोडरे (वय १५) आणि त्यांचा भाऊ पवन ज्ञानेश्वर बोडरे (वय १२) हे बारामती तालुक्यातील मुर्ती या मामाच्या गावाला जाण्यासाठी इलेक्ट्रिक स्कुटीवरून निघाले होते.
चौधरवाडी फाट्याजवळ त्यांची स्कुटी आणि आयशर टेम्पो (क्र. DD०१-उ-९३४३) यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. थडक इतकी जबरदस्त होती की स्कुटीचा अक्षरशा चक्काचूर झाला. अपघातानंतर टेम्पोने स्कुटीला काही अंतर फरपटत नेल्याने दुर्घटनेची तीव्रता अधिक वाढली, या अपघातात सेजल व अक्षरा या दोन्ही बहिणींचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पवन गंभीर जखमी झाला.
त्याला तातडीने बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने रात्री उशिरा पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघाताचे भीषण स्वरूप पाहून उपस्थित नागरिकही हादरून गेले.
Advertisement
Tags :

.