For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : लोणंद बसस्थानकात दांडक्याने मारहाणीत एकाचा मृत्यू

04:40 PM Jun 04, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   लोणंद बसस्थानकात दांडक्याने मारहाणीत एकाचा मृत्यू
Advertisement

लोणंद : येथील बसस्थानक घटना परिसरात झालेल्या भांडणातून ४५ वर्षीय व्यक्तीचा निघृण खून झाल्याची उघडकीस आली आहे. मृताचे नाव युबराज पोपट जगताप (वय ४५) असून ते हनुमंत शेळके यांच्या बिटभट्टीजवळ, लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा येथे वास्तव्यास होते.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अश, मंगळवारी २ जून रोजी सायंकाळी सुमारे ५.४५ वाजण्याच्या सुमारास बसस्थानकात मृत युवराज जगताप या प्रकरणी लोणंद बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक यशवंत लाशीराम गांगुर्डे (बय ५०) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यांच्या तक्रारीवरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. बाचाबाचीचे पर्यवसान भांडण झाले. याच वादातून अज्ञात वाढीवाल्या इसमाने कळकाच्या जाड दांडक्याने युवराज जगताप यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केले. यात ते गंभीर जखमी झाले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 
उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल कृष्णा खांबे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने तपास केला आहे.
या प्रकरणी लोणंद पोलिसांनी संशयित विजय संजय नालट (रा. बुरूड गल्ली, ता. कोरेगाव) याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास लोणंद पोलीस करत आहेत. 
बसस्थानकात पोलीस चौकी उभारा 
लोणंद बसस्थानकात पोलीस चौकी असावी, अशी मागणी 'तरुण भारत ने यापूर्वीच वृत्तातून मांडली होती. मात्र याबाबत अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. बसस्थानकात कायमस्वरूपी पोलीस चौकी असती, तर आज एका कामगाराचा अमूल्य जीव वाचू शकला असता. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन लोणंद बसस्थानकात तातडीने पोलीस चौकी उभारावी. - कय्युम मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते 
Advertisement
Advertisement
Tags :

.