For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विकासात्मक नेतृत्व धैर्यशील माने यांना निवडून देऊया ; माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर यांचे आवाहन

01:31 PM Apr 29, 2024 IST | Abhijeet Khandekar
विकासात्मक नेतृत्व धैर्यशील माने यांना निवडून देऊया   माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर यांचे आवाहन
Advertisement

मलकापूर.. प्रतिनिधी

सत्तेचा वापर जनतेच्या विकासासाठी करणाऱ्या नेतृत्वाला निवडून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया .कोट्यावधी रुपयाच्या निधीच्या माध्यमातून या विभागाचा सर्वांगीण विकास साधला आहे .या निधीची पोच म्हणून लोकसभा निवडणुकीत खा. धैर्यशील माने यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदचे माजी बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती सर्जेराव पाटील (पेरीडकर ) यांनी मलकापूर येथे आयोजित प्रचार फेरी दरम्यान केले .

Advertisement

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खा धैर्यशील माने यांच्या प्रचार फेरी दरम्यान शिवतीर्थ सुभाष चौक मलकापूर येथे आयोजित प्रचार फेरी प्रसंगी ते बोलत होते . सर्जेराव पाटील म्हणाले कि आमदार विनय कोरे यांनी कोट्यावधी रुपयाच्या माध्यमातून मलकापूर शहरासह शाहूवाडी तालुक्याचा सर्वागीण विकास साधला आहे . सत्ता ही केवळ कुरघोडीचे राजकारण करण्यासाठी न घेता जनतेच्या विकासासाठी महत्त्वाची असते .आणि हिच विचारधारा जपत आमदार विनय कोरे यांनी विकासाची भूमिका घेतली आहे . त्याच बरोबर खासदार धैर्यशील माने यांनी देखील कोट्यावधी रुपयाच्या निधीतून विकास साधला आहे . अशा जनतेच्या विकासात्मक दृष्टीने वाटचाल करण्राया नेतृत्वाच्या पाठीशी आपण खंबीरपणे राहणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

यावेळी शाहुवाडी पन्हाळा विधानसभा प्रभारी प्रवीण प्रभावळकर , शिवसेना तालुकाप्रमुख विजयसिंह देसाई ,माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर , दिलीप पाटील ,भारत गांधी ,विश्वास लोखंडे रमेश चांदणे ,सुरेश भोगटे, रवी पाथरे , शामराव लोखंडे , मलकापूर अर्बनचे संचालक गुलाब भटारी ,दत्ता भोसले , किरण लगारे ,अजय गुरव ,नीलम लगारे, भाजपच्या जिल्हा सदस्य पुष्पा पास्ते आदींच्या सह जनसुराज्य भाजप महायुतीचे कार्यकर्त्य उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.