For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

देशाची लुट करणाऱ्या भाजपाला येत्या निवडणूकीत जनतेने हदपार करा; आमदार सतेज पाटील यांचं आवाहन

06:12 PM Mar 09, 2024 IST | Abhijeet Khandekar
देशाची लुट करणाऱ्या भाजपाला येत्या निवडणूकीत जनतेने हदपार करा  आमदार सतेज पाटील यांचं आवाहन
Satej Patil

चुये / प्रतिनिधी

धर्माच्या नावाखाली जातीपातीचे कुटील राजकारण करून समाजा - समाजात तेढ निर्माण करण्याचे काम भाजपकडून  देशात सुरु आहे . वाढत्या महागाई च्या दृष्टचक्रात  सामान्य जनता उद्योजक आणि शेतकरी बांधव भरडून गेला आहे . देशाची घटनाच बदलून हुकुमशाही पध्धतीने राजकारण सुरु आहे त्यामुळे सामान्य जनतेमध्ये भाजपबदल प्रचंड असंतोष आहे . त्यामुळे येणारी निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी होऊन देशाची लुट करणाऱ्या भाजपाला लोकसभेच्या निवडणूकीत जनतेने  हद्दपार करावे असे आवाहन काँग्रेसचे गटनतेने आमदार सतेज पाटील यांनी केले नंदगाव ता करवीर  विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाहू साखर कारखान्याचे माजी संचालक मारुती निगवे होते .

Advertisement

आमदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्यातून मिळालेल्या पाच कोटी एकोणीस लाख निधीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला .

आमदार सतेज पाटील म्हणाले ..
शेतकऱ्यांना एका बाजूला पेन्शन द्यायची आणि दुसऱ्या बाजूला त्या शेतकऱ्यांच्या खतांचे डिझेलचे आणि शेती अनुषंगिक वस्तूंचे दर वाढून जीएसटी च्या माध्यमातून त्यांची लूट करायची हाच धंदा या सरकारने सुरू केला आहे .त्यामुळे या नीतीने देशातील शेतकरी . उद्योजक व देशोधडीला लागला आहे . विकास कामाचा डांगोरा पेटवत भाजप सरकारने दहा वर्षात देशाचे कर्ज वाढवण्याचे पाप केलं .येणारा काळ हा धोकादायक काळ आहे .सुज्ञ जनतेने सावध होऊन देशातील सामान्य जनता शेतकरी उद्योजक यांच्या माध्यमातून देश सुजलाम सुफलाम करणाऱ्या काँग्रेस शिवाय पर्याय नाही .

Advertisement

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले ..
सामान्य जनता आणि त्यांचे प्रश्न केंद्रबिंदू मानून जनतेला विश्वासात घेऊन दक्षिणेत आमदार म्हणून काम केले आहे .ग्राम विकासाच्या विविध योजना राबवत आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 700 कोटीची विकासकामे मतदार संघात केलेली आहेत त्यामुळे  आम्ही निधी लावला नाही असे एकही गाव दक्षिणेत सापडणार नाही , विरोधक काय करतात यापेक्षा आम्ही जनतेसाठी काय केलं हे दक्षिणची सुज्ञ जनता जाणून आहे .युवकांची बेरोजगारी कमी करण्यासाठी मेळाव्याच्या माध्यमातून आठ हजार हून अधिक युवकांच्या हाताला रोजगार दिला . मतदार संघातील शेतकरी युवक महिला बचत गट सामान्य जनता या सर्वांचे प्रश्न शासन दरबारी मांडून सोडवणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केलेला आहे करत आहे .प्रवाहाच्या विरोधात जनतेसाठी काम करण्याची धमक आ .सतेज पाटील यांच्यातचं आहे .  .सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस शिवाय पर्याय नाही हाच विचार सर्वांनी सोबत घेऊन कामे केली पाहिजेत.

Advertisement

प्रास्तापिक व स्वागत करताना जयवंत नरके म्हणाले नरके गट नेहमी कॉग्रेसच्या पाठीमागे ठाम उभा आहे. त्यामुळे साहेब तुम्ही सांगाल ते धोरण ..आणि बांधाल ते तोरण आम्ही स्विकारू यात शंका नाही . गावाला पाच कोटी एकोणीस लाखाचा निधी दिल्याबद्दल आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांचा नागरी सत्कार यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला .

या कार्यक्रमाला शाहू साखर संचालक संजय नरके गोकुळ संचालक शशिकांत पाटील बिद्री साखर कारखाना संचालक एस बी पाटील आर एस कांबळे जिल्हा बँक संचालक स्मिता गवळी  श्रीपती पाटील एकनाथ पाटील सागर पाटील विश्वास दिंडोर्ले शाबाजी कुराडे  संजय पाटील कृष्णात चव्हाण सिकंदर मुजावर विजय नलवडे अभिजित नरके  बाळासो चौगले अमोल नरके संग्राम नरके बी .के .चौगले  सचिन टिक्के . यांचासह ग्रामपंचायत सदस्य विविध संस्या पदाधिकारी हजर होते . सुत्रसंचालन सुहास पाटील यांनी तर आभार रोहीत निगवे यांनी मानले .

Advertisement
Tags :
×

.