महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सैनिकांसाठी ‘लोकमान्य’ची ठेव योजना

11:20 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कारगिल विजयदिनाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘लोकमान्य’तर्फे मुदतठेव योजनेचा शुभारंभ

Advertisement

बेळगाव : आपल्या जिवाची बाजी लावून भारताच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या, ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता, डोळ्यात तेल घालून अहोरात्र देशाच्या संरक्षणासाठी झटणाऱ्या वीर सैनिकांच्या भवितव्यासाठी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीने पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी, 26 जुलैला कारगिल युद्धाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून ‘लोकमान्य’तर्फे ‘सैनिक सन्मान’ योजना ही मुदत ठेवीची योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये आजी-माजी सैनिकांना 10.80 टक्क्यांचा व्याजदर मिळणार असून 25 महिन्यांच्या कालावधीसाठी ही योजना असणार आहे.

Advertisement

शुक्रवारी बेळगाव येथील लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या प्रधान कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कर्नल उदय बोरुडे, कर्नल भारत राव, कर्नल मॅथ्यूज, कर्नल कृष्णन कुमार, कर्नल दीपक गुरूंग, लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे आदी उपस्थित होते.   योजनेचा शुभारंभ केल्यानंतर ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी योजनेचे कौतुक केले. सैनिक आणि त्यांच्या परिवारासाठी सुरू केलेली ही योजना वाखाणण्याजोगी असून आम्हाला त्याचा आनंद आहे. लोकमान्य सोसायटीने कायमच सैनिकांसाठी अनेक उपक्रम केले आहेत. या सोसायटीची उत्तरोत्तर प्रगती होत राहो. अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

ज्येष्ठ माजी सैनिकांना 0.50 टक्क्यांचा अतिरिक्त व्याजदर 

या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिक असलेल्या माजी सैनिकांना 0.50 टक्क्यांचा अतिरिक्त व्याजदर देऊ करण्यात आला आहे. यामुळे ज्येष्ठ सैनिकांना या योजनेतून 11 टक्क्यांपेक्षा अधिक व्याजदर मिळणार आहे. या योजनेमध्ये आजी-माजी सैनिक, वीरपत्नी यांना आपल्या ठेवी करता येणार आहेत. या योजनेत काही अटींच्या आधारे ठेवींवर 90 टक्क्यापर्यंत कर्ज देण्याची सुविधाही देण्यात येणार आहे. याचबरोबर मुदतपूर्व ठेव काढण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

योजना मर्यादीत कालावधीपुरती कार्यरत राहणार असून, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यातील सर्व शाखांमध्ये योजनेचा लाभ घेऊन सैनिकांनी आपल्या ठेवी ठेवता येतील. यामध्ये राज्यातील आजी-माजी सैनिकांना आपल्या मुदत ठेवी ठेवता येतील. सैनिक व त्यांच्या वीरपत्नींना किमान दहा हजार रुपयांची रक्कम ठेव म्हणून ठेवणे बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये मोठ्या संख्येने आजी-माजी सैनिकांचे वास्तव्य आहे. या दोन्ही राज्यांमध्ये लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाची अनेक कार्यालये असल्याने त्या ठिकाणीही सैनिकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे या योजनेचा लाभ या सर्व सैनिकांना व्हावा, अशी लोकमान्य सोसायटीची अपेक्षा असून, अधिकाधिक आजी-माजी सैनिक, वीरपत्नी यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या भवितव्यासाठी गुंतवणूक करावी, असे आवाहन लोकमान्य मल्टिपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे करण्यात आले  आहे.

अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या

अधिक माहितीसाठी लोकमान्य सोसायटीच्या जवळच्या शाखेला भेट देऊनही योजनेची माहिती घेता येईल. आजवरच्या लोकमान्य सोसायटीच्या प्रवासात देशासाठी सर्वस्व सैनिक हे कायमच आदरस्थानी राहिले आहेत. यामुळेच लोकमान्यतर्फे बेळगाव येथील मराठा लाईट इंप्रंट्रीच्या मुख्यालयात रुग्ण्वाहिका, संग्रहालय निर्मितीत योगदान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आणि पुण्यातील ‘ऋण’ या संस्थेस केलेली मदत, अशा विविध उपक्रमांद्वारे ‘लोकमान्य’ने सैनिकांप्रती आपला आदर व्यक्त केला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article