लोकमान्य टिळकांचे कार्य जनतेला प्रेरणा देणारे !
प्रा .यशोधन गवस यांचे प्रतिपादन '; देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयातलोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
सावंतवाडी
लोकमान्य टिळक हे ते थोर सत्यवादी होते .इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी केसरी व मराठा अशी वृत्तपत्रे चालू केली. स्वतंत्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व ते मिळवणारच अशी सिंहगर्जना केली . मंडाले च्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळकांचे कार्य जनतेला प्रेरणा देणारे आहे असे प्रतिपादन लोकमान्य ट्रस्ट संचलित देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयाचे प्राचार्य यशोधन गवस यांनी आज केले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी शभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयांत साजरी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी विचार मांडले .यावेळी प्राध्यापक साईप्रसाद पंडित ,आनंद नाईक, शैलेश गावडे , मेधा मयेकर व इतर कर्मचारी वर्ग , विद्यार्थी उपस्थित होते.