सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लोकमान्य सोसायटीतर्फे खास गुंतवणूक योजना
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गेल्या 29 वर्षांपासून आर्थिक सेवांमध्ये विश्वासार्ह अशी नावाजलेली संस्था सरकारी कर्मचारी निवेश योजना ही खास गुंतवणूक योजना सादर करत आहे. या योजनेत 11% वार्षिक व्याजदर दिला जातो, तसेच 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त 0.50% व्याजदर देण्यात येत आहे . ही योजना विद्यमान आणि निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असून, त्यांच्या बचतीत सुरक्षित व लाभदायक वाढ करण्याची ही सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे, "सरकारी कर्मचारी" यामध्ये निमसरकारी कर्मचारी, शासकीय अनुदानित संस्थांमधील कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील कर्मचारी आणि स्वायत्त सरकारी संस्थांमधील कर्मचारी यांचाही समावेश करण्यात आला आहे.
सरकारी कर्मचारी निवेश योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्ये
- आकर्षक व्याजदर: 11% वार्षिक
- ज्येष्ठ नागरिक लाभ: 60 वर्षांवरील व्यक्तींना अतिरिक्त 0.50% व्याजदर
- किमान गुंतवणूक: ₹10,000/-
- कालावधी: 33 महिने
- पात्रता: विद्यमान आणि निवृत्त सरकारी कर्मचारी, यामध्ये निमसरकारी कर्मचारी, शासकीय अनुदानित संस्थांमधील कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील कर्मचारी आणि स्वायत्त सरकारी संस्थांमधील कर्मचारी यांचाही समावेश
ही योजना लोकमान्य सोसायटीच्या सदस्यांसाठी विश्वासार्ह आणि सहज आर्थिक उपाय प्रदान करण्याच्या ध्येयाशी सुसंगत आहे.
पुणे, महाराष्ट्र येथे मुख्यालय असलेली लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही विश्वास व उत्कृष्टतेचा वारसा लाभलेली अग्रगण्य संस्था आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि दिल्ली या चार राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या या संस्थेची 213 शाखांचे विस्तृत जाळे असून, ग्राहकांना विविध प्रकारच्या आर्थिक सेवा पुरवल्या जातात. लोकमान्य सोसायटी फिक्स्ड डिपॉझिट्स, रिकरिंग डिपॉझिट्स, पिग्मी डिपॉझिट्स, कर्जे, विमा, आणि म्युच्युअल फंड यांसारखी अशी विशिष्ठ सेवा देत आहे. आर्थिक समावेश आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी लोकमान्य सोसायटी नेहमीच प्रयत्नशील आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या लोकमान्य शाखेला भेट द्या किंवा 1800-212-4050 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधा असे आव्हाहन संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.