For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकमान्य सोसायटीतर्फे 'भव्य किल्ला स्पर्धा २०२६'चे आयोजन; यंदा बेळगाव शहरासह ग्रामीण भागाचाही समावेश

11:47 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
लोकमान्य सोसायटीतर्फे  भव्य किल्ला स्पर्धा २०२६ चे आयोजन  यंदा बेळगाव शहरासह ग्रामीण भागाचाही समावेश
Advertisement

बेळगाव: लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गड-किल्ल्यांची माहिती नवी पिढी व बालचमूंपर्यंत पोहोचावी आणि शहरात शिवमय वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने यंदाही पारंपरिक उत्साहात 'लोकमान्य दिवाळी किल्ला स्पर्धा २०२६'चे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव शहर आणि ग्रामीण विभागातील शालेय विद्यार्थी, युवक मंडळे, गणेश मंडळे व सामान्य नागरिकांसाठी खुली असणारी ही स्पर्धा पूर्णपणे निःशुल्क असून, यामध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र स्पर्धा आणि कोणत्याही प्रकारचा ऐतिहासिक किल्ला करण्याची मुभा देण्यात आली आहे. किल्ल्याचे नाव, प्रकार आणि संबंधित ऐतिहासिक प्रसंग नमूद करणे अनिवार्य असून लोकमान्य सोसायटीने पुरविलेला छापील अर्जच वैध मानला जाईल.

Advertisement

या स्पर्धेचे अर्ज ३१ ऑक्टोबर २०२६ पासून सकाळी १० ते ५ या वेळेत भाग्यनगर, शहापूर, रामलिंगखिंड गल्ली, वडगाव आणि ग्रामीण भागासाठी-टिळकवाडी गुरुवार पेठेतील लोकमान्य कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मिळतील. स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी १३ नोव्हेंबर २०२६ ही अंतिम तारीख असून, इच्छुकांनी आपले अर्ज वरील शाखांमध्ये जमा करावेत. किल्ल्याची सजावट पूर्ण झाल्यावर दिवसाच्या उजेडात काढलेले व्हिडिओ चित्रीकरण अनिवार्यरीत्या पाठवावे लागणार असून, १८ नोव्हेंबरपासून परीक्षणास सुरुवात होईल आणि परीक्षक मंडळाचा निर्णय अंतिम राहील.

प्रत्येक विभागातील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षीसे दिली जाणार असून, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट किल्ल्यास 'गडाचा राजा' हा किताब प्रदान केला जाणार आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर, उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, डॉ. दामोदर वागळे ,पंढरी परब, सुबोध गावडे आणि विठ्ठल प्रभू यांचे मार्गदर्शन लाभले असून, अधिक माहितीसाठी शहर विभागाकरिता निखिल पाटील- ८१२३८ ७९६४६ , किशोर हळदणकर-८०५०४ २६०८७ आणि ग्रामीण विभाग नोंदणी करीता लोकमान्य कॉर्पोरेट ऑफिस- ०८३१-२४०६७०० संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.