For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकमान्य सोसायटीतर्फे ‘गणरंग 2026’ चित्रकला स्पर्धा; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळणार व्यासपीठ

06:10 PM Sep 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
लोकमान्य सोसायटीतर्फे ‘गणरंग 2026’ चित्रकला स्पर्धा  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळणार व्यासपीठ
Advertisement

पणजी : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.तर्फे ‘सृष्टीचा उत्सव, बाप्पाची भक्ती!’ या संकल्पनेवर आधारित ‘गणरंग 2026’ चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनाशक्तीला आणि कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

स्पर्धेसाठी दोन गट करण्यात आले असून गट अमध्ये इयत्ता पहिली ते सहावी, तर गट बमध्ये इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेचा प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून सहभागी विद्यार्थ्यांनी ए-4 आकाराच्या कागदावर चित्र काढणे आवश्यक आहे.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून उत्कृष्ट चित्रांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेली चित्रे 28 तारखेपर्यंत जवळच्या लोकमान्य शाखेत जमा करावीत.

Advertisement

अधिक माहितीसाठी नजीकच्या लोकमान्य शाखेशी संपर्क साधावा किंवा 9322921551, 9322921538, 9322921604 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन लोकमान्य सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.