For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

लोकमान्य सोसायटीच्या ‘गणरंग 2026’ चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात; सावंतवाडीत बालचित्रकारांचा गौरव

01:07 PM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
लोकमान्य सोसायटीच्या ‘गणरंग 2026’ चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात  सावंतवाडीत बालचित्रकारांचा गौरव
Advertisement
सावंतवाडी : प्रतिनिधी : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आयोजित ‘गणरंग 2026’ या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोमवार, 26 ऑक्टोबर रोजी सावंतवाडी येथील सोसायटीच्या क्षेत्रीय कार्यालयात उत्साहात पार पडला. या स्पर्धेतील लहान आणि मोठ्या गटातील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

मुलांमधील कलागुणांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यात चित्रकलेची आवड निर्माण करणे आणि त्यांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ‘गणरंग’ स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादामुळे बालचित्रकारांना प्रोत्साहन मिळाले आहे.

Advertisement

लहान गटात दुर्वा कापसे प्रथम

‘गणरंग 2026’ चित्रकला स्पर्धेच्या लहान गटात कु. दुर्वा संतोष कापसे हिने प्रथम क्रमांक पटकावला. कु. प्रार्थना प्रणय नाईक हिने द्वितीय, तर कु. दुर्वा अजित सावंत हिने तृतीय क्रमांक मिळवला.

मोठ्या गटात कु. वेणू अजित सावंत हिने प्रथम क्रमांक मिळवला. कु. कौशल माधवराव भोसले याने द्वितीय, तर कु. सुयश सद्गुरू याने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांचे मान्यवरांनी अभिनंदन केले.

Advertisement

पालकांकडून उपक्रमाचे कौतुक

लोकमान्य सोसायटीच्या ‘गणरंग’ या उपक्रमाचे पालकवर्गाकडून विशेष कौतुक करण्यात आले. अशा स्पर्धांमुळे मुलांमध्ये चित्रकलेविषयी आवड निर्माण होते, त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळतो आणि आत्मविश्वास वाढतो, अशी भावना पालकांनी व्यक्त केली.

स्पर्धांमध्ये सहभागी होण्यामुळे मुलांना स्वतःची कला सादर करण्याची संधी मिळते. तसेच इतर स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यश संपादन करण्याची प्रेरणाही मिळते, असे पालकांनी नमूद केले.

या बक्षीस वितरण समारंभाला लोकमान्य सोसायटीचे सावंतवाडी क्षेत्रीय व्यवस्थापक समीर राणे, सहाय्यक क्षेत्रीय व्यवस्थापक महेश तानावडे, वरिष्ठ व्यवस्थापक मुरारी वालावलकर आणि ग्रोथ मार्केटिंग व्यवस्थापक साक्षी मयेकर उपस्थित होते. याशिवाय सोसायटीचे कर्मचारी, स्पर्धक आणि पालकवर्गानेही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या ‘गणरंग’ उपक्रमामुळे बालचित्रकारांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. अशा उपक्रमांमधून नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळत असल्याने या स्पर्धेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

Advertisement
Tags :

.