For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'तू म्हणशील तसं...' मधून नाशिककरांनी अनुभवला निखळ आनंद

07:08 PM Jun 07, 2024 IST | Abhijeet Khandekar
 तू म्हणशील तसं     मधून नाशिककरांनी अनुभवला निखळ आनंद
Advertisement

नाशिक : प्रतिनिधी

नवरा आणि बायको याचं नाते म्हटले की प्रेम, आपुलकी, राग, रुसवा, विश्वास अशा वेगवेगळ्या भावनांचा सुंदर संगम असतो. अगदी हाच अनुभव नाशिककरांनी ‘तू म्हणशील तसं’ या नाटकातील मिस्टर आणि मिसेस कुलकर्णी यांच्या अभिनयातून घेतला. आजच्या धकाधकीच्या काळात नात्यावर भाष्य करतानां या नाटकाने स्वत:चे वेगळेपण जपत प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केल्याची भावना कालिदास नाट्यगृहातून बाहेर पडतांना प्रेक्षकांनी व्यक्त केली.

Advertisement

नाशिकमध्ये १० वर्षापासून कार्यरत असलेल्या लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड फक्त आर्थिक योजना राबवित नाही तर नाशिककरांची आवड लक्षात घेऊन मनोरंजनासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेत असते. हिच परंपरा कायम राखत या नाटकाचे आयोजन करण्यात आल होते. या नाट्यप्रयोगातून येणार उत्पन्न लोककल्प फौंडेशन या समाजसेवी संस्थेला देण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.