महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीची आकर्षक परताव्यासह ‘लोक मान्सून योजना’ सादर

11:27 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने उत्कृष्ट परतावा देण्यासाठी खास विकसित केलेली ‘लोक मान्सून योजना’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही योजना 1 जून ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत सक्रिय असेल, ज्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांची बचत जास्तीत जास्त करण्याची संधी मिळेल. या योजनेंतर्गत गुंतवणूकदारांना आकर्षक असा 10.25 टक्के व्याजदराचा लाभ घेता येईल. ‘लोक मान्सून योजने’मध्ये रु. 10,000 किमान गुंतवणुकीसह सहभागी होता येईल. कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. ज्येष्ठ नागरिक ठेवीदारांना आधार देण्याचे महत्त्व ओळखून, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी त्यांच्या गुंतवणुकीवर वार्षिक 0.50 टक्के अतिरिक्त व्याज देते, ज्यामुळे त्यांचा परतावा वाढतो.

Advertisement

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी या योजनेच्या शुभारंभप्रसंगी आनंद व्यक्त करताना, ‘लोक मान्सून योजना’ आमचे आदरणीय सदस्य आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. आमचा विश्वास आहे की, ज्येष्ठ नागरिक आणि ठेवीदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षक परतावा आणि अतिरिक्त फायदे देऊन चालना देऊन सदस्यांच्या विविध गरजा पूर्ण करत आहोत.‘लोक मान्सून योजने’बद्दल अधिक माहितीसाठी आणि गुंतवणुकीच्या या अपवादात्मक संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छूक व्यक्ती शहरातील लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या कोणत्याही शाखेला भेट देऊ शकतात.

Advertisement

सोसायटीचे तज्ञ आर्थिक सल्लागार मार्गदर्शन देण्यासाठी आणि सर्वात योग्य गुंतवणूक पर्याय निवडण्यात मदत करण्यासाठी उपलब्ध असतील. तसेच टोल फ्री क्र. 18002124050 वरही संपर्क साधता येईल. सोसायटीच्या नियम व अटीनुसार ‘लोक मान्सून योजने’त कर्ज सुविधा योजना पण उपलब्ध आहे. तसेच मुदतपूर्व ठेव काढण्याची सोय आहे. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप.सोसायटी ही आर्थिक उत्पादने आणि सेवांच्या विस्तृत श्रेणीद्वारे सदस्यांना सक्षम करण्यासाठी वचनबद्ध असलेली एक आघाडीची वित्तीय संस्था आहे. समृद्ध वारसा आणि बाजारपेठेतील मजबूत उपस्थितीसह सोसायटीने 28 वर्षांहून अधिक काळ आपल्या सभासदांना उत्कृष्ट आर्थिक गुंतवणुकीच्या योजना प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article