For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘लोकमान्य’ म्हणजे नात्यांमधील गुंतवणूक

10:29 AM Nov 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘लोकमान्य’ म्हणजे नात्यांमधील गुंतवणूक
Advertisement

लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे प्रतिपादन

Advertisement

नाशिक : लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीत फक्त पैशांमध्ये गुंतवणूक होत नाही तर मानवी नात्यांमध्ये गुंतवणूक होत असल्याचे गौरवोद्गार लोकसभा माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी काढले आहेत. त्या नाशिकमध्ये लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्या होत्या. यावेळी लोकमान्यचे क्षेत्रिय व्यवस्थापक हेमंत फडके यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी लोकमान्यचे क्षेत्रिय सहव्यवस्थापक संदीप पिंगळे उपस्थित होते. शहरातील कुर्तकोटी शंकराचार्य न्यास येथे घेतलेल्या या भेटीत फडके यांनी नाशिकमध्ये लोकमान्य सोसायटीच्या झालेल्या विस्ताराची माहिती दिली. सोबतच लोककल्प फौंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. महाजन यांनी लोकमान्यच्या बेळगाव येथील कार्यालयाच्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. या भेटीमुळे लोकमान्य नेहमीच नात्यांची जपणूक करत असल्याची प्रचिती येते, असे त्यांनी सांगितले. कुठल्याही संस्थेने विकास करताना समाजभान ठेवणे गरजेचे असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.