For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकमान्य ग्रंथालयाचा सुटीतील उपक्रम ‘गोष्टींचा बडबड बाजा’

06:39 AM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
लोकमान्य ग्रंथालयाचा सुटीतील उपक्रम ‘गोष्टींचा बडबड बाजा’
Advertisement

 त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

शाळांना दसऱ्याची सुटी 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या सुटीत आपली श्रवण, वाचन आणि ग्रहण कला अधिक धारदार करण्यासाठी लोकमान्य ग्रंथालय खास बालगोपाळांसाठी एक अनोखा उपक्रम सुरू करीत आहे. राज्य मराठी विकास संस्थेच्या अनुदानांतर्गत सुरू होणारा हा उपक्रम पुण्याच्या तज्ञ प्रज्ञा वझे चालवणार आहेत.

सोमवार दि. 5 ऑक्टोबरपासून शनिवार दि. 10 ऑक्टोबरपर्यंत सलग 6 दिवस रोज सकाळी 10 ते 1 या वेळेत येथील वरेरकर नाट्या संघाच्या आर्ट गॅलरीमध्ये गोष्टींचा बडबड बाजा वाजणार आहे. ऐकणे, वाचणे, आकलन आणि बोलणे समृद्ध करणारा हा उपक्रम मराठी व इंग्रजी माध्यमातील वय वर्षे 8 ते 13 म्हणजेच इ. 3 री ते 7 वीपर्यंत या वयोगटासाठी असून बालगोपाळांना त्यात विनामूल्य सामील होता येईल.

Advertisement

या शिबिरात प्रसंग कथन, कथा वाचन, कथा लेखन, कथा कथन, कविता समजून घेणे, कविता गायन, गोष्टी सांगणे असे भरगच्च कार्यक्रम असतील. मजेदार कृती सत्रांमधून हा उपक्रम साध्य केला जाणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी लोकमान्य ग्रंथालयात 3 ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी रंजनाताई यांच्याशी 8050479148 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.