महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोकमान्य चषक बीडीएफए वरिष्ठ फुटबॉल स्पर्धेला आजपासून प्रारंभ

10:08 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यता प्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक बीडीएफए वरीष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेला मंगळवार दि.13 पासून लव्हडेल स्कूलच्या स्पोर्टींग प्लॅनेट मैदानावर प्रारंभ होत आहे. सदर स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या संचालक मंडळ सदस्य तसेच बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, उपाध्यक्ष लेस्टर डिसोजा, गोपाळ खांडे, पॅट्रॉन राम हदगल, सचिव अमित पाटील, एस.एस. नरगोडी, अल्लाबक्ष बेपारी, प्रशांत देवदानम, मतिन इनामदार, अरिहंत बल्लाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. आजचे सामने : 1) टिळकवाडी फुटबॉल अॅसॉल्ट वि. दर्शन युनायटेड दु. 3.30 वा. 2) निपाणी एफसी वि. चौगुले एफसी सांय 5 वा.

Advertisement

अॅस्ट्रोटर्फ मैदानामुळे होतकरू फुटबॉलपटूंना संधी

Advertisement

बेळगावात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अॅस्ट्रोटर्फ फुटबॉल मैदान लव्हडेल स्कूलच्या स्पोर्टींग प्लॅनेट मैदानावर साकार झाले आहे. या मैदानावर राज्य व राष्ट्रीय स्तरीय स्पर्धांचे आयोजन होत आहे. याचा फायदा नक्कीच होतकरू फुटबॉलपटूंना मिळणार असून बीडएफएने ही संधी होतकरू फुटबॉलपटूंना मिळवून दिली आहे. या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन बीडीएफएचे अध्यक्ष पंढरी परब यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article