For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकमान्य सोसायटीतर्फे वाडोस विद्यालयात मोफत सॅनिटरी पॅड वितरण

01:27 PM Jul 18, 2025 IST | अनुजा कुडतरकर
लोकमान्य सोसायटीतर्फे वाडोस विद्यालयात मोफत सॅनिटरी पॅड वितरण
Advertisement

कुडाळ

Advertisement

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि लोककल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार १७ जुलै रोजी जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालय, वाडोस येथे स्त्रीरोगतज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळी स्वच्छता आणि वाढत्या वयात होणारे बदल याविषयी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी स्त्री रोगतज्ञ डॉ. गौरी गणपत्ये, लोकमान्य सोसायटी सावंतवाडी शाखेचे क्षेत्रीय प्रमुख बाळासाहेब पांडव, लोकमान्य सोसायटीच्या शाखा प्रमुख अर्चना सरनाईक, सीएसआर प्रतिनिधी गौरी जुवेकर ,प्रा. आनंद राठये, प्रा.विठोबा कडव, प्रा.श्रेया पवार,प्रा. दीक्षा म्हाडगूत,असिस्टंट मॅनेजर श्रेया पास्ते, सीनियर अकाउंट असिस्टंट श्रुती राऊळ, दिनेश नानचे आदी उपस्थित होते.लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि लोककल्प फाउंडेशन समाजाप्रती असलेले आपले उत्तरदायित्व नेहमीच जपले आहे. केवळ आर्थिक विकासाला प्राधान्य न देता, सामाजिक कल्याणासाठीही सातत्याने प्रयत्नशील असतात. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून या संस्थांनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.