लोककल्पतर्फे आमटे, ओलमणी, कुसमळी शाळांना वॉटर फिल्टर
11:12 AM Jul 09, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : लोककल्प फौंडेशनने खानापूर तालुक्यातील आमटे, ओलमणी व कुसमळी येथील एमएचपीएस शाळांना वॉटर फिल्टर दिले. खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील काही गावे लोककल्प फौंडेशनने लोकमान्य सोसायटीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत दत्तक घेतली आहेत. त्यापैकी तीन गावांतील शाळांना वॉटर फिल्टर देण्यात आले. या देणगीबद्दल तिन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांनी लोककल्पचे आभार मानले. विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने लोककल्पने ही देणगी दिली आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article