लोककल्पतर्फे आमगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे सेंट्रा केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या साहाय्याने खानापूर तालुक्यातील आमगाव येथे बुधवार दि. 7 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुमारे 55 हून अधिक ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिरामध्ये मोफत वैद्यकीय सल्ला, प्राथमिक तपासणी तसेच आजारांपासून बचावासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. सेंट्रा केअरच्या डॉ. सीमा, परिचारक प्रज्योत हिरेमठ, अनोष एन. बी. आणि मोदगी यांनी वैद्यकीय सेवा दिली. तसेच लोककल्प फौंडेशनचे संतोष कदम व संदीप पाटील यांनी समन्वयक म्हणून कार्य पाहिले. लोककल्प फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांच्या समावेशक आरोग्य सेवेच्या संकल्पनेतून या उपक्रमाला प्रेरणा मिळाली आहे. खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पोहचविणे या उद्देशातून लोककल्प निरंतर कार्यरत आहे. या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आमगाव ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.