For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोककल्पतर्फे ओलमणी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

11:05 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
लोककल्पतर्फे ओलमणी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
Advertisement

बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे ओलमणी (ता. खानापूर) येथे केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या साहाय्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये सुमारे 50 हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करून सल्लामसलत करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटलचे वैद्यतज्ञ डॉ. ऐश्वर्या, डॉ. अजित खाने, श्रीधर के. आणि नारायण यांनी आरोग्य सुविधा दिल्या. लोककल्पचे संतोष कदम, हर्षद जगताप आणि संदीप पाटील यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी समन्वयक म्हणून काम पाहिले. या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल ओलमणी ग्रामस्थांनी लोककल्प आणि केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटलचे आभार मानले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन डॉ.किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनातून ग्रामीण नागरिकांना मूलभूत आरोग्य सेवांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने लोककल्प फौंडेशनतर्फे सातत्याने कार्य सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.