लोककल्पतर्फे बामणवाडी येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर
बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.च्या सीएसआर उपक्रमांतर्गत लोककल्प फौंडेशन आणि एम. एम. जोशी कोडकणी आय केअर सेंटर यांच्या सहाय्याने मंगळवार दि. 6 रोजी बामणवाडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डोळ्यांच्या आरोग्याला प्रोत्साहन देणे व दृष्टीशी संबंधित समस्यांचे लवकर निदान करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुमारे 60 हून अधिक बामणवाडी ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेतला.
याप्रसंगी पिरनवाडी शाखा व्यवस्थापक मंदा खवणेवाडकर आणि संपूर्ण पिरनवाडी शाखेचे कर्मचारीवर्ग, बेळगाव सीएसआर विभाग प्रमुख निशांत जाधव, ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक पायनाचे व परशराम गावडे उपस्थित होते. यावेळी कोडकणीच्या आय केअर सेंटरच्या वैद्यकीय पथकाने ग्रामस्थांना योग्य सल्ला देत डोळ्यांशी संबंधित आजार, कमजोर दृष्टी, मोतिबिंदू आणि इतर अपवर्तक समस्या ओळखून तपासणी केली. यावेळी आवश्यक रुग्णांना सल्लामसलत केली. हा उपक्रम लोककल्प फौंडेशन आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या सामाजिक बांधिलकीचे व सर्वसामान्यांसाठी सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल बामनवाडी ग्रामस्थांनी लोककल्प फौंडेशन आणि कोडकणी आय केअर सेंटरचे आभार व्यक्त केले आहेत.